News Updates

सोलापूर विद्यापीठाचे नाव संशोधनाच्या क्षेत्रात उंचावण्याचा प्रयत्न करु

सोलापूर-  सोलापूर विदयापीठाला प्रगतीच्या शिखरावर नेणे हे माझे ध्येय असून संशोधनाच्या क्षेत्राात विदयापीठाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न राहील असे मत डॉ मृणालिनी फडणवीस यांनी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारताना व्यक्त केले.

 नव्या कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी रविवार दिनांक 6 मे 2018 रोजी दुपारी 12 वाजता प्रभारी कुलगुरु प्रा. नितीन करमळकर यांच्याकडून कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारली, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी कुलसचिव डॉ. गणेश मंझा, विशेष कार्यासन अधिकारी डॉ. व्ही.बी.पाटील, परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक बी.पी.पाटील, वित्त व लेखा अधिकारी डॉ. बालाजी शेवाळे यांच्यासह विदयापीठाचे अधिकारी, शैक्षणिक संकुलांचे संचालक आदी उपस्थित होते.

कुलगुरु डॉ. फडणवीस पुढे म्हणाल्या की, सोलापूर विदयापीठाच्या कुलगुरुपदाची धुरा सांभाळण्याची संधी मला लाभली याचा मला मनापासून आनंद झाला आहे. सोलापूर विदयापीठ परीक्षाविषयक कामकाजात आघाडीवर आहे. यापुढच्या काळात या विदयापीठाला सर्वच क्षेत्राात आघाडीवर नेण्याचा माझा प्रयत्न राहील. प्रामुख्याने पदवी स्तरापासून विदयार्थ्यांनी संशोधनाकडे विशेष लक्ष द्यावे असा माझा कटाक्ष राहील. विदयापीठातील सर्व विभागांना भेटी देऊन , त्यांच्या अडचणी जाणून घेणे व त्या अडचणी सोडविणे याकडेही लक्ष देणार असल्याचे असल्याचे त्यांनी सांगितले.

रुसाकडून मिळणा-या निधीचा चांगला उपयोग करुन विद्यापीठाच्या सर्वच संकुलांच्या विकासाला गती देणे, कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरु करणे, नॅकव्दारा विद्यापीठास अ दर्जा मिळविणे इत्यादी  ाापले संकल्प असल्याचेही कुलगुरु डॉ, फडणवीस म्हणाल्या.

याप्रसंगी बोलताना प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर म्हणाले की जवळपास पाच महिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नियमित कार्यभार सांभाळण्याबरोबरच पाच महिन्यांसाठी सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याची संधी मला मिळाली. सोलापूर  विदयापीठ आणि आमच्या विद्यापीठात सामंजस्य करार केलेला आहे, याव्दारे या दोन विद्यापीठांचे परस्पर सहकार्य आणखी वाढावे. या विद्यापीठाची काही कामे मार्गी लावता आली, याचे समाधान आहे, राहिलेली कामे नव्या कुलगुरु समर्थपणे तडीस लावतील असा विश्वास मला वाटतो. विद्यार्थी जेव्हा शिक्षण घेऊन बाहेर पडतील तेव्हा त्यांना रोजगाराची संधी मिळेल अशा प्रकारचे अभ्यासक्रम असावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

 

 

Related News