News Updates

सामाजिक शास्त्रे संकुलाचा लौकिक आणखी उंचावण्याचा प्रयत्न करु

सोलापूर – सोलापूर विदयापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाने स्थापनेनंतरच्या मागच्या दहा वर्षात शैक्षणिक क्षेत्रात जो लौकिक प्राप्त केला आहे तो अधिक उंचावण्याचा आपला प्रयत्न राहील अशी ग्वाही नवनियुक्त संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी दिली.

 सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. अशोककुमार 29 एप्र2ल 2018 रोजी निवृत्त झाले. त्यांच्या जागी संचालक म्हणून विदयापीठाने डॉ. गौतम कांबळे यांची नियुक्ती केली आहे. या दिवशी दुपारी चार वाजता प्रा. अशोककुमार यांनी सामाजिक शास्त्रे संकुलाच्या संचालकपदाचा कार्यभार डॉ. गौतम कांबळे यांच्याकडे सुपूर्द केला. प्रा. अशोककुमार यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन डॉ, कांबळे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी डॉ. कांबळे बोलत होते. डॉ. कांबळे यांच्याकडे वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या प्रभारी संचालकपदाचा तसेच सेंटर फॉर फोरसाईट स्टडीजच्या संचालकपदाचाही कार्यभार सोपविण्यात आला आहे.

डॉ. कांबळे पुढे म्हणाले की. प्रा. अशोककुमार यांनी या संकुलाची घडी व्यवस्थित बसविली आहे. त्यामुळे यापुढच्या काळात संकुलाचे कामकाज चालविण्यात काही अडचणी येणार नाहीत. या संकुलातील सर्व विभागात विद्यार्थ्यांसाठी सुविधा वाढविणे, संशोधन कार्यात संकुलाचे अधिक योगदान देणे,  सोलापूर जिल्हयातील प्रश्न सोडविण्यासाठी बांधीलकी मानून कार्य करणे यावर विशेष भर राहील.

 प्रा. अशोककुमार याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, या संकुलाला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून केला. यापुढच्या काळात शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांची जाणीव ठेऊन, देश स्तरावर आणि जागतिक स्तरावरील स्पर्धेला सामोरे जाऊ शकणारे सक्षम विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न करावा लागेल.

याप्रसंगी सामाजिक शास्त्रे संकुलातील डॉ. प्रभाकर कोळेकर , डॉ. रवींद्र चिंचोलकर, डॅा. प्रकाश व्हनकडे, प्रा. अंबादास भासके, प्रा. मधुकर जक्कन, प्रा. अमोल गजधाने, प्रा. नवले, प्रा. स्नेहल नष्टे, तेजस्विनी कांबळे , मोनाली नारायणकर यांच्यासह अनेकांनी डॉ. गौतम कांबळे यांना शुभेच्छा दिल्या.

परीचय

सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे  यांनी १९९९ साली शिवाजी विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयाची एम.ए ची पदवी प्राप्त केली. २००३ साली शिवाजी विद्यापीठातून  एम .फिल. ची पदवी प्राप्त केली . तर २००९ साली शिवाजी विद्यापीठातून पीएच .डी.ची पदवी  पूर्ण केली.Contribution of Dr..B.R.Ambedkar to the indian economic thought and development - An analytical study हा त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाचा विषय होता.
    डॉ. कांबळे मागील १९ वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात सहायक प्राध्यापक, सहयोगी प्रााध्यापक या पदावर कार्यरत आहेत . तसेच मलेशिया , फ्रान्स , फिनलंड देशाना त्यांनी भेटी दिल्या आहेत . आतापर्यंत डॉ कांबळे यांच्या मार्गदर्शनखाली ७ विद्यार्थ्यांनी पी.एच.डी  पूर्ण केली आहे तर ३ विद्यार्थ्यांची पी. एच. डी  सुरु आहे . सोलापूर विद्यापीठात ते डिसेंबर 2010 पासून सहयोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत.
  त्यांनी तीन संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून सध्या दोन संशोधन्‍ा प्रकल्पाचे कार्य करीत आहेत.  त्यांनी एकूण  ३१ सेमिनार व कार्यशाळेत शोधनिबंध सादरीकरण केले.हभाग नोंदवला  आहे . तर 23 शोधनिबंध राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात प्रसिध्द झाले आहेत. त्यांची तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कार्यक्षम , विद्यार्थीप्रिय अध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे.
    

 

 

Related News