News Updates

समाजहिताचे संशोधन प्रकल्प हाती घ्या: प्रा. अशोककुमार यांचे आवाहन

सोलापूर – सोलापूर विदयापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलाचा संचालक म्हणून कार्य करताना समाजहिताचे संशोधन प्रकल्प हाती घेतले , यापुढच्या काळात सामाजिक शास्त्रे संकुलाने हा वारसा पुढे न्यावा असे आवाहन प्रा. इ.एन. अशोककुमार यांनी केले.

सोलापूर विदयापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाच्या  संचालक पदावरुन प्रा. इ.एन. अशोककुमार सेवानिवृत्त होत आहेत्‍. या निमित्ताने दिनांक 27 एप्रिल 2018 रोजी संकुलात आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात ते बोलत होते.याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील तसेच हैद्राबाद येथील केंद्रीय विदयापीठातील प्रा. शिवाप्रसाद उपस्थित होते तसेच डॉ. जी.एस. कांबळे उपस्थित होते.

प्रा. अशोककुमार सर पुढे  म्हणाले की सोलापूरची माणसे आणि संस्कृती मला मनापासून  भावली. सामाजिक शास्त्रे संकुलात सहका-यांची चांगली साथ लाभली त्यामुळे या संकुलाला आकार देण्याचे कार्य करु शकलो. यापुढचा काळ समाजिक शास्त्रांसाठी महत्वाचा काळ असून या काळात समाजाला प्रगतीपथावर नेण्याचे कार्य या संकुलाने करावे.

 प्रा. शिवा प्रसाद म्ह्णाले की , जी व्यक्ती इतरांसाठी काहीतरी करण्याच्या ध्येयाने सतत काय्‍4र असते ती व्यक्ती कधीच निवृत्त होत नाही , त्या अर्थाने प्रा. अशोककुमार निवृत्त होत नसून ते आपल्या नव्या कार्याची सुरुवात करीत आहेत. प्रा. अशोककुमार हे एकच चुंबकासारखे व्यक्तीमत्व आहे, त्यामुळे एकदा माणूस त्यांच्या संपर्कात आला की सतत येतच राहतो        

डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, ग्रामीण विकासाच्या संदर्भात प्रा. अशोककुमार यांचे संसोधन व कार्य महत्वपूर्ण आहे. त्यांनी अनेक संशोधन प्रकल्प हाती घेऊन मोलाचे कार्य केले आहे.  ग्रामीण विकास हा अशोक कुमार यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांच्यामध्ये एक उत्तम संशोधक आहे जो ग्रामीण विकासातील समस्यांवर संशोधन करून योग्य मार्ग सुचवू शकतो     यापुढ्च्या काळात कर्नाटकातील शिमोगा भागात ते ग्रामीण विकासाच्या कार्यासाठी जात हेत. निवृत्तीनंतरही समाजहितासाठी धडपडणारी प्रा. अशोककुमार यांच्यासारखी माणसे फार कमी आहेत.आज नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहे त्यामुळे ग्रामीण विकास हा मुद्दा मागे पडत आहे.  ग्रामीण भागातील लोकांमध्ये ग्रामीण विकास करण्याची खूप मोठी क्षमता आहे त्यामुळे शहरी करण्याबरोबरच ग्रामीण भागाचा विकास करणे खूप महत्त्वाचे आहे  

डॉ. जी.एस. कांबळे म्हणाले की प्रा. अशोककुमार यांनी मागील दहा वर्षात सामाजिक शास्त्र संकुलाचे चांगले नेतृत्व केले. फिनलँडच्या तुर्कु विदयापीठासमवेतचा सामंजस्य करार हा त्यातील एक मानबिंदू होय.

याप्रसंगी सामाजिक शास्त्रे संकुलातील आजी-माजी विदयार्थी, अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. अशोककुमार कार्यावर मास कम्युनिकेशन विभागाने तयार केलेला माहितीपटही यावेळी दाखविण्यात आला. डॉ. माया पाटील यांनी परिचय करुन दिला.डॉ.प्रभाकर कोळेकर यांनी प्रास्ताविक केले, डॉ. प्रकाश व्ह्नकडे यांनी आभार मानले. तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. या समारंभात डॉ. जी.एस. कांबळे, डॉ. धनराज पाटील, डॉ. माया पाटील. डॉ. रवींद्र चिंचोलकर,डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. प्रकाश व्हनकडे, प्रा. मदुकर जक्कन, प्रा. अंबादास भासके. प्रा. ज्ञानेश्वरी हजारे, प्रा. स्नेहल नष्टे, प्रा. पवार, प्रा. अमोल गजधाने, स्वाती कांबळे,  यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. सर्वांनी प्रा. अशोककुमार यांनी केलेल्या चांगल्या कार्याची माहिती दिली. सामाजिक शास्त्र संकुलतील जनसंज्ञापन व पत्रकारिता विभागाचे विद्यार्थी समाधान भोरकडे इतिहास व पुरात्त्वशास्त्र विभागाचे विद्यार्थी डॉ सदाशिव देवकर, अर्थशास्त्र विभागाची विद्यार्थिनी करुणा राऊत व ग्रामीण विकास विभागाचे विद्यार्थी डॉ रविराज गायकवाड यांनी अशोक कुमार सरांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या . मास कम्युनिकेशनच्या सुसंवाद या माजी विदयार्थी संघटनेतर्फे अध्यक्ष रणजित वाघमारे, सलमान पीरजादे, अजित बिराजदार, शीतलकुमार कांबळे, दीपाली जाखलेकर, तृप्ती बसुदेपाटील आदींनी प्रा. अशोककुमार यांचा सत्कार केला.

प्रा. अशोककुमार यांना सोलापूर विदयापीठाच्या वतीनेही 27 एप्रिल 2018 रोजी दुपारी 4 वाजता विदायापीठाच्या मुख्य सभागृहात निरोप देण्यात आला. 

Related News