News Updates

प्रा. अशोककुमार यांची सेवानिवृत्ती; सामाजिक शास्त्रे संकुलात निरोप समारंभ

सोलापूर – सोलापूर विदयापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. इ.एन. अशोककुमार यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने दिनांक 27 एप्रिल 2018 रोजी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

 सामाजिक शास्त्रे संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम 27 एप्रिल 2018 रोजी सकाळी 11 वाजता सुरु होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील तसेच हैद्राबाद येथील केंद्रीय विदयापीठातील प्रा. शिवाप्रसाद उपस्थित राहणार आहेत.  

सोलापूर विदयापीठात ऑक्टोबर 2008 पासून सामाजिक शास्त्रे संकुलाची सुरुवात झाली, तेव्हापासून या संकुलाचे संचालक म्हणून प्रा. अशोककुमार कार्यरत आहेत. या दहा वर्षाच्या कालावधीत शिक्षण, संशोधन, प्रशासकीय कामकाज या सर्वच दृष्टीकोनातून सामाजिक शास्त्रे संकुलाला प्रगतीच्या शिखरावर नेण्याचे कार्य प्रा. अशोककुमार यांनी केले. नॅकचे मानांकन, ऍकेडेमिक ऑडिट, फिनलँडमधील तुर्कू विदयापीठासमवेत सामंजस्य करार करुन सुरु केलेला फ्युचरिस्टीक स्ट्डी अभ्यासक्रम, मानव विकास संशोधन अहवाल, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय परिषदा , संशोधन प्रकल्प यासह अनेक बाबतीत त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले. प्रा. अशोककुमार यांच्या  या कामगिरीनिमित्त त्यांचा गौरव या निरोप समारंभात करण्यात येणार आहे.

याप्रसंगी सामाजिक शास्त्रे संकुलातील आजी-माजी विदयार्थी, अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. प्रा. अशोककुमार कार्यावर मास कम्युनिकेशन विभागाने तयार केलेला माहितीपटही यावेळी दाखविण्यात येणार आहे. या समारंभास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. जी.एस. कांबळे, डॉ. माया पाटील. डॉ. रवींद्र चिंचोलकर,डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. प्रकाश व्हनकडे आदींनी केले आहे.

प्रा. अशोककुमार यांना सोलापूर विदयापीठाच्या वतीनेही 27 एप्र2ल 2018 रोजी दुपारी 4 वाजता विदायापीठाच्या मुख्य सभागृहात निरोप देण्यात येणार आहे.

Related News