News Updates

राज्यस्तरीय स्पर्धेत संख्याशास्त्र विभागाच्या विदयार्थ्यांना व्दितीय पारितोषिक

सोलापूर- पुणे विद्यापीठ संख्याशास्त्र विभाग व  न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ वसंत पी भापकर यांच्या स्मरणार्थ एम.एस.सी संख्याशास्त्र विषयातील विदयार्थीसाठी  राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सोलापूर विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाच्या विदयार्थ्यांना व्दितीय पारितोषिक मिळाले.
                 न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय अहमदनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सोलापूर विद्यापीठाबरोबरच पुणे, मुंबई जळगाव, विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता सदर स्पर्धेत एकूण 23 प्रकल्प सादर करण्यात आले होते त्यामध्ये सोलापूर विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागाच्या आर्या वाघोलीकर, सुमीनी सुतार, रणजीत रानभरे या विदयार्थ्यांनी Revised Duckworth-Lewis Rule for Rain Interrupted ODI Matches या विषयाचे सादरीकरण केले ज्यामध्ये त्यांना व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले
     सदर स्पर्धेसाठी विदयार्थ्यांना संख्याशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक वि भा घुटे, प्रा सी.जी गार्डि, प्रा एम.एम.देशपांडे प्रा जी.आर.आराध्ये यांचे मार्गदर्शन लाभले.              या स्पर्धेत प्रथम क्रमांक न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या महाविद्यालयाला मिळाला तर तृतीय क्रमांक पुणे विद्यापीठाने पटकावला तसेच मुंबई विद्यापीठात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले

Related News