News Updates

जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्यास सक्षम असलेले विदयार्थी घडवा – कुलगुरु करमळकर

सोलापूर -  विविध विषयातील सीमारेषा नाहीशा होत आहेत. यापुढच्या काळातील जागतिक स्पर्धेला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकणारे सक्षम विदयार्थी घडविण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमात बदल घड्वून उपयुक्त शिक्षण दया असे आवाहन सोलापूर विदयापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी केले.

सोलापूर विदयापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या वतीने  ‘आऊटकम बेस्ड एज्युकेशन- न्यू ट्रेंडस इन असेसमेंट एन्ड एज्युकेशन या विषयावर ‘ प्राचार्य, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष , विदयापीठाचे अधिकारी आदींसाठी 13 मार्च 2018 रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. सोलापूर विदयापीठाच्या मुख्य सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यशाळेत कुलगुरु डॉ. करमळकर बोलत होते. मंचावर परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक बी.पी.पाटील, विशेष कार्यासन अधिकारी प्रा. व्ही.बी.पाटील, वित्त व लेखा अधिकारी डॉ. बालाजी शेवाळे होते.

 कुलगुरु डॉ. करमाळकर पुढे म्ह्णाले की, जगभरातील जी नामांकित विदयापीठे आहेत त्यातील काय्‍संस्कृती पण स्वीकारली पाहिजे. अध्यापकांनी आपले ज्ञान वाढवित नेले पाहिजे. जे अध्यापन संशोधन, अध्यापन कराल ते गुणवत्तापूर्ण असेल याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. विदयार्थी जेव्हा शिक्षण घेऊन बाहेर पडतील तेव्हा त्यांच्या अंगी कोणत्या क्षमता निर्माण झाल्या याला खरे मह्त्व आहे. परीक्षेच्या संद्र्भात अग्रवाल समितीने केलेल्या 42 शिफारसी पूर्णतः अमलात आणण्याचा प्रयत्न करावा अशी प्क्षाही त्यांनी व्यक्त केली.

या कार्यशाळेत  विज्ञान व तंत्रज्ञान विदयाशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.एस.आर.गेंगजे, सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य व्ही.पी.उबाळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. ए.ए. घनवट, सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठातील विशेष कार्यासन अधिकारी ललित पवार व उपकुलसचिव प्रमोद भडसावळे आदींनी परीक्षांमध्ये कोणत्या सुधारणा कराव्यात , प्रश्नपत्रिकांचे स्वरुप कसे असावे याबाबत मार्गदर्शन केले.

प्रारंभी विशेष कार्यासन अधिकारी डॉ. व्ही.बी.पाटील यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, विदयापीठाचा नवीन कायदा आला आहे व त्यात परीक्षेच्या संदर्भात नवे बदल अपेक्षित आहेत, त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी व सूचना जाणून घेण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

 परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी.पी.पाटील म्हणाले की, यापुढच्या काळात ऑनलाईन परीक्षा घेणे, ऑनलाईन उत्तरपत्रिका तपासणे, प्रश्नपेढी, प्रश्नपत्रिकापेढीतयार करने यासह अनेक महत्वपूर्ण कामे करावयाची आहेत. यासंदर्भात विदयापीठातील अधिकारी व महाविदयालयांचे प्राचार्य यांनी एक्त्र आणून विचारविनीमय करण्यात आला आहे.

प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सहायक कुलसचिव एस.एन.कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, उपकुलसचिव यू.व्ही.मेटकरी यांनी आभार मानले. कार्यक्रमास व्यवस्थापन परिषद सदस्य , प्राचार्य , विविध अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Related News