News Updates

भारताला ज्ञानाचे उर्जा केंद्र बनविण्याची जबाबदारी प्राचार्यांवर- डॉ. कुमार सुरेश

अमरावती. - भारताला नॉलेज पॉवर बनविण्यामध्ये प्राचार्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शिक्षण, विकास व प्रशासन संस्थेच्या शैक्षणिक प्रशासकीय विभागाचे प्रमुख डॉ. कुमार सुरेश यांनी केले. 

अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत ते बोलत होते.व्यासपीठावर प्र-कुलगुरु डॉ. राजेश जयपूरकर, मानव संसाधन विकास केंद्राचे संचालक डॉ. प्रसाद वाडेगांवकर व डॉ.सौ. वर्षा लोमटे उपस्थित होते.यु.जी.सी. मानव संसाधन विकास केंद्र आणि संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठाच्या  संयुक्त विदयमाने 10 मार्च 2018 रोजी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते

डॉ. सुरेश पुढे म्हणाले की,महाविद्यालयांसारख्या महत्वपूर्ण शैक्षणिक संस्थांचे प्रमुख म्हणून प्राचार्य  नेतृत्व करतात.  त्या संस्थेच्या विकासासोबतच विद्याथ्र्यांना सर्वकष ज्ञान व संस्थेचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी प्राचार्यांवर असते.  प्राचार्य मिटच्या माध्यमातून प्राचार्यांची भूमिका, कार्य, जबाबदारी, नेतृत्वगुण यावर सविस्तर प्रकाश टाकल्या जाणार असल्यामुळे प्राचार्यांच्या नेतृत्व व व्यक्तिमत्व गुणांच्या विकासामध्ये मोलाची भर पडणार असून 

डॉ. कुमार सुरेश पुढे म्हणाले, यु.जी.सी. च्या माध्यमातून विद्यापीठांचे कुलगुरु, कुलसचिव, वित्त व लेखा अधिकारी, प्राचार्य यांचे सातत्याने सभेच्या माध्यमातून उच्च शिक्षणातील नवीन बदल, घडामोडी, भविष्यातील उच्च शिक्षणाची दिशा यावर विचारमंथन केल्या जाते.  विद्यापीठात यु.जी.सी.-मानव संसाधन विकास विभागाच्या माध्यमातून आयोजित प्राचार्य मिटमध्ये प्राचार्यांचे अनुभव, भेडसावणा­या समस्यां, यु.जी.सी. गाईडलाईन्स, शैक्षणिक नियोजन, अभ्यासक्रम, सूक्ष्म नियोजन, रँकींग आदींवर प्रकाश टाकल्या जाईल, त्याचा फायदा जास्तीतजास्त सहभागी प्राचार्यांच्या माध्यमातून विद्याथ्र्यांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्र-कुलगुरु डॉ. राजेश जयपूरकर म्हणाले, शिक्षणक्षेत्रात प्राचार्यांची जबाबदारी खूप मोठी आहे.  महाविद्यालयीन विकासासोबतच विद्याथ्र्यांना अधिकाधिक ज्ञान देवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राचार्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतात.  प्राचार्यांच्या एका निर्णयाचा लाभ अनेक विद्याथ्र्यांना होत असतो.  प्राचार्य मिटच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्राच्या उज्वल भविष्यासाठी फलदायी चर्चा, विचारमंथन होईल असेही ते म्हणाले.

उद्घाटन सत्रानंतर पहिल्या सत्रात डॉ. कुमार सुरेश यांनी ‘लिडरशीप रोल ऑफ प्रिन्सीपॉल इन हाईअर एज्युकेशन’ या विषयावर, दुस­या सत्रात श्री शिवाजी महाविद्यालय, परभणीचे प्राचार्य डॉ.बी.यु. जाधव यांनी ‘रोल ऑफ आय.सी.टी. इन हाईअर एज्युकेशन’ या विषयावर, तर तिस­या सत्रात आर.डी. राष्ट्रीय महाविद्यालय, बांद्रा, मुंबईचे प्राचार्य डॉ. दिनेश पंजवानी यांनी ‘शैक्षणिक संस्थांमधील शैक्षणिक, प्रशासकीय व वित्तीय शिस्त’ या विषयावर व्याख्यान दिले.  सत्रानंतर लगेचच अभिप्राय व चर्चा करण्यात आली.

पाहुण्यांचे रोपटे देवून यु.जी.सी. मानव संसाधन विकास केंद्राचे संचालक डॉ. प्रसाद वाडेगांवकर यांनी स्वागत केले.  प्रास्ताविक भाषणातून प्राचार्य मिट आयोजनामागील भूमिका विषद केली आणि पाहुण्यांचा परिचय करुन दिला.  संचालन करीत आभार डॉ.सौ. वर्षा लोमटे यांनी मानले.  कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अधीक्षक श्री विजय चव्हाण, श्री शशीकांत खाचणे, श्री शरद कोंडे, श्री अंकित ठाकूर, आशा प्रधान यांनी परिश्रम घेतले.  प्राचार्य मिटला पाचही जिल्ह्रांतील 52 चे वर प्राचार्य उपस्थित होते.

Related News