News Updates

वाणिज्य क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी - डॉ. डी.डी.पुजारी

सोलापूर -  आजच्या काळात वाणिज्य क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी निर्माण झाल्या आहेत या संधीचा उपयोग करुन घ्या असे आवाहन सोलापूर विदयापीठाच्या वाणिज्य  व व्यवस्थापन विदयाशाखेचे  प्रभारी अधिष्ठाता प्रााचार्य डॉ. डी.डी .पुजारी यांनी केले.

सोलापूर विदयापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागातर्फे 10 मार्च 2018 रोजी आयोजित करण्यात आलेल्या आजी- माजी विद्यार्थी मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. . अध्यक्षस्थानी वाणिज्य व व्यवस्थापन संकुलाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. ई. एन .अशोककुमार होते. डॉ. पुजारी पुढे म्हणाले की, आजच्या काळात नोकरीसाठी केवळ पदवी पुरेशी नाही. पदवीबरोबर आवश्यक कौशल्येही आत्मसात करणे तितकेच गरजेचे आहे. डॉ.अशोककुमार यांनी आपल्या भाषणात  सांगितले की , विभागातून पदवी घेऊन बाहेर माजी विदयार्थी नव्या शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांना चांगले सहकार्य करु शकतात. त्यासाठी सर्वांनी आपल्या विभागाच्या संपर्कात राहणे महत्वाचे आहे.

      माजी विदयार्थ्यांचा आजी विदयार्थ्यांशी परिचय व्हावा आणि विभागाची झालेली प्रगती विदयार्थ्यांना कळावी या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

         यावेळेस प्रा. डॉ. अमोल गजधाने यांनी 1 ऑगस्ट 2011 साली सुरू झालेल्या वाणिज्य विभागाचा आजपर्यंतच्या प्रगतीचा आलेख व भविष्यातील तरतुदींचा आढावा विदयार्थ्यांसमोर मांडला. यानंतर माजी विदयार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि ध्वनीचित्रफीतीव्दारे आठवणींना उजाळा देण्यात आला. 

           तसेच सतत माजी विदयार्थ्यांच्या संपर्कात राहता यावे आणि विभागातर्फे होणाऱ्या विविध उपक्रमात  विदयार्थ्यांना सहभाग घेता यावा यासाठी सोशल मीडियावर माजी विदयार्थ्यांच्या स्वतंत्र गटाची निर्मिती करण्यात आली. 

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक . डॉ. रमेश गाढवे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. रेवणनाथ नवले यांनी केले, आभार प्रा. प्रियांका चिप्पा यांनी मानले.

Related News