News Updates

डॉ. माया पाटील यांना दोन मानाचे पुरस्कार

सोलापूर -   जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर विद्यापीठातील  सामाजिक शास्त्रे संकुलातील पुरातत्व शास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. माया जगदीश पाटील यांना सोलापूर पोलीस आयुक्तालय तर्फे रणरागिणी पुरस्कार तर महाराष्ट्र राज्यस्तरीय सोलापूर स्त्रीरोग प्रसूती शास्त्र संघटना व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने मानवता पुरस्काराने गौरविण्यात आले.  

         सोलापूर शहर पोलीस विभागाच्या वतीने महिला दिनी शिवछत्रपती रंगभवन मध्ये आयोजिलेल्या स्त्री गौरव सोहोळा कार्यक्रमात वर्षातील 365 दिवस सतत कार्यरत असणाऱ्या आणि समाजच्या कल्याणासाठी सतत झटणाऱ्या विविध क्षेत्रातील 8 महिलांना रणरागिणी पुरस्काराने  गौरवण्यात आले.  त्यात डॉ माया पाटील यांना न्या.आर.व्ही.वाघुले यांच्या हस्ते रणरागिणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी महापौर शोभाताई बनशेट्टी,, पोलिस आयुक्त माहादेव तांबडे, पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, पोलिस उपायुक्त अपर्णा चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. माया पाटील यांना इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे   संयम, धैर्य, शिक्षण, मानवता या गुणांनी परिपूर्ण असणाऱे व्यक्तिमत्व म्ह्णून गौरविण्यात आले.

Related News