News Updates

आरोग्य हीच संपत्ती- डॉ. मीना जिंतूरकर

सोलापूर - आरोग्य हे आयुष्यातील खरी संपत्ती आहे त्यामुळे प्रत्येकाने आपले आरोग्य जपणे आवश्यक आहे .हल्लीचे जीवन जरी वेगवान पद्धतीचे असेल तरी महिला आपल्या आरोग्याची काळजी घेउ शकतात असे मत उस्मानाबाद येथील  प्रख्यात आरोग्य तज्ञ डॉ . मीना जिंतूरकर यानी व्यक्त केले.
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सोलापूर विद्यापीठात ' महिला आरोग्य यावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात डॉ. जिंतूरकर ह्या बोलत होत्या. डॉ. जिंतूरकर पुढे म्हणाल्या की समाजात अनेकदा  स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू बनताना दिसतात. मुलगाच वंशाचा दिवा असावा हट्ट धरुन त्याच सुनेला त्रास देतात. महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असावा याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ . गणेश मंझा होते.यावेळी ते बोलताना  म्हणाले की सर्वात मोठा संस्कार म्हणजे अन्नातून होणारा संस्कार ..कारण अन्न संस्कारामधून विचार आणि पुढच्या जडणघडणीला चालना मिळते . त्यामुळे प्रत्येक गृहिणीने हे संस्कार आपल्या कुटूंबातील व्यक्तीना द्यावे .विद्यार्थीनी , महिला कर्मचारी यांच्या आरोग्यासंबधी सोलापूर विद्यापीठ आरोग्य केंद्रामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात अशी माहिती कुलसचिव मंझा यानी दिली. प्रत्येक स्त्रीने आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दैनंदिन कामामधून वेळ काढुन आरोग्यासंबधी वेळापत्रक तयार करणे गरजेचे आहे .
     स्त्रीभ्रूण हत्येवर भाष्य करणा-या  लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले . तसेच विद्यापीठातिल ज्या कर्मचाऱ्यांना एक किंवा दोन मुली आहेत त्याचा विद्यापीठ प्रशासना तर्फे सत्कार करण्यात आले .
यावेळेस पुरातत्त्व विभागाचे विभाग प्रमुख डॉ माया पाटील यांनी पाहुण्याची ओळख करून दिली  तर प्रास्ताविक सोलापूर विद्यापीठाच्या सहाय्यक कुलसचिव अच्॒ना साळुंके यांनी केले .
या कार्यक्रमाचे आभार  संगणकशास्त्रे संकुलाच्या सहाय्यक प्राध्यापिका जे . डी. माशाळे यांनी मानले. तर सूत्रसंचालन तेजस्विनी कांबळे यांनी केले .

दुपारच्या सत्राात महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

Related News