News Updates

सिध्दाराम पाटील यांची सोलापूर विदयापीठाच्या  अधिसभेवर निवड

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाच्या राज्यपाल नामनिर्देशित अधिसभा (सिनेट) सदस्यांची नावे कुलपती तथा राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी नियुक्ती केली.यात सिध्दाराम पाटील यांचा समावेशआहे.

या नामनिर्देशित  सदस्यामध्ये ॲड. अमोल कळके, प्रा. गजानन धरणे, मोहनजी डांगरे, सिद्धाराम पाटील, डॉ. एम. बी. देशमुख, रेणुका महागावकर, दीपक चव्हाण, मकरंद अनासपुरे यांचा समावेश आहे. सिध्दाराम पाटील यांनी सोलापूर विदयापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागातून  एम.ए.मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम पूर्ण केलेला अाहे. ते सध्या दिव्य मराठी वृत्तपत्रात मुख्य उपसंपादक या पदावर कार्यरत आहेत.सोलापूर विद्यापीठ अधिसभेसाठी (सिनेट) माननीय राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून माझी नियुक्ती झाल्याचे  कळाले. पत्रकार क्षेत्रातून ही निवड होणे माझ्यासाठी सन्मानजनक आहे. यावेळी ज्यांच्यामुळे मी घडलो त्या मान्यवर पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो अशी प्रतिक्रीया सिध्दाराम पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सिध्दाराम पाटील यांच्या या निवडीबद्दल सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ.इ.एन.अशोककुमार, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ.रवींद्र चिंचोलकर , डॉ. जी.एस.कांबळे, डॉ. माया पाटील, डॉ.प्रभाकर कोळेकर, डॉ.प्रकाश व्हनकडे, सहायक प्राध्यापक अंबादास भासके, सहायक प्राध्यापक मधुकर जक्कन, तेजस्विनी कांबळे मास कम्युनिकेशनच्या सुसंवाद या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे अध्यक्ष रणजित वाघमारे  यासह इतर पदाधिका-यांनी अभिनंदन केले आहे.

Related News