News Updates

5 ते 12 मार्च दरम्यान भूशास्त्र संकुलात प्रशिक्षण कार्यक्रम

सोलापूर- सोलापूर विदयापीठातील भूशास्त्र संकुलाच्या वतीने 5 ते 12 मार्च 2018 दरम्यान एक आठवड्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

मल्टीडिसिप्लिनरी ऍप्रोच एनविरोन्मेंटल इम्पॅक्ट असेसमेंट  यासंदर्भात या प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आल्याची माहिती भूशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. पी.प्रभाकर यांनी दिली आहे.या प्रशिक्षणवर्गाचे उदघाटन 5 मार्च 2018 रोजी होणार आहे. या प्रशिक्षणवर्गात विविध महाविदयालये, विदयापीठातील अध्यापक सहभागी होणार आहेत.

भूपर्यावरणाच्या संदर्भातील समस्यांबाबत संशोधनाला चालना देणे तसेच या क्षेत्रातील नवे ज्ञान अध्यापकांपर्यंत पोहोचविणे या उद्देशाने या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी प्रा.पी.प्रभाकर यांच्या नेतृत्वाखाली , डॉ. विनायक धुळप्‍, डॉ.डी.डी.कुलकर्णी, सुयोग बाविस्कर, डॉ.आर.एस.पवार, कु.एम.एम्‍.इंगेवार, डी.टी.गुजर, पी.एल.उन्हाळे, वाय.एम.दुर्गवार, श्रीमती पी.एम.देशपांडे, कु.एन.टी.चव्हाण., ए.एस.धेंडे आदी कार्यरत आहेत.

Related News