News Updates

विकिपीडिया ज्ञानकोषासाठी लेखन

सोलापूर -  सोलापूर विदयापीठातील मास कम्युनिकेशन विभागाचे विदयार्थी  अरविंद बगले यांनी मराठी विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोषासाठी 54  दिवसात 51 लेख लिहिण्याची व संपादित करण्याची कामगिरी केली आहे.

मराठी भाषा पधंरवडा निमित्ताने राज्य मराठी विकास संस्था आणि सेंटर फॉर इंटरनेट सोसायटी या संस्थेच्या सहकार्याने सोलापूर विदयापीठातील मास कम्युनिकेशन विभागाने 1 जानेवारी 2018 रोजी   विकिपीडिया कार्यशाळा घेतली होती. यात ३० जणानी सहभाग घेतला होता. यात सहाभागी असलेले  विदयार्थी अरविंद बगले यांनी ५४ दिवसात ५१ लेख नव्याने तयार करुन संपादित केले आहेत . यामध्ये सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वर, संत बसवेश्वर, संतज्ञानेश्वर , छत्रपती शिवाजी महाराज , डॉ . ए. पी . जे अब्दुलकलाम ,महात्मा गांधी ,स्वामी विवेकानंद, डॉ बाबासाहेब आंबेडकर , अब्राहम लिकम , अल्बर्ट आइन्स्टाइन , रतन टाटा , धीरूभाई अंबानी, बिल गेटस, सुंदर पिचाई , सचिन तेंडुलकर , स्टिव्ह जॉब्स , व . पु .काळे ,चार्ली चॉप्लिन , सत्या नडेला , आर्य चाण्यक्य अशा व्यक्तिवरती लेख संपादित केले आहे.
             संगणक तंत्रज्ञान कॉम्प्युटर नेटवर्क , टोपोलॉजी, अज्ञावलि प्रोग्रॅमिंग भाषा , सी शार्प , पायथॉन जावा, लिनक्स, पि.एच.पी, प्रगत जावा, महाजाल, विज्ञान, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विविध मान्यवरांची कोटस सहित्य इ. विषयावर ज्ञानकोशात लेखन केले आहे. 
             नागरिकानी हे सर्व लेख वाचावेत आणि त्यावर आपली प्रतिक्रिया द्यावी असे आवाहन अरविंद बगले यांनी केले आहे. या उपक्रमासाठी त्यांना विकिपीडिया समन्ववयक सुबोध कुलकर्णी, सोलापूर विद्यापीठातील प्रत्रकारिता विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ रवींद्र  चिंचोलकर, प्रा मधुकर जक्कन, प्रा आंबादास भासके यांचे मार्गदर्शन लाभले.

Related News