News Updates

संगणकशास्त्र संकुलाचे यश

सोलापूर - कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया व आय. आय. टी. पवई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या टेक्नेस्ट इंडिया या परिषदेत सोलापूर विद्यापीठाच्या संगणक शास्त्र संकुलास पारितोषिक मिळाले . 
यात डॉ.राजीवकुमार मेंते व विदयार्थिनी अजिंक्या बिराजदार यांना एकूण ३५० गुण प्राप्त झाले होते . सोलापूर विद्यापीठाच्या संगणक शास्त्र सकुलातील अजिंक्या बिराजदार (एम. सी. ए. )या विद्यार्थिनीस उत्कृष्ट प्रकल्पासाठी हा पुरस्कार मिळाला आहे . अजिंक्याने स्टडी किट फॉर नर्सरी स्टुडंटस हा प्रकल्प सादर केला होता . तर डॉ. राजीवकुमार मेंते यांना उत्कृष्ट विभागप्रमुख हा पुरस्कार देण्यात आला . 
या पुरस्काराचे वितरण आय. आय. टी. मुंबई येथे करण्यात आले . अजिंक्या हिला डॉ मेंते यांनी मार्गदर्शन केले  होते . या परिषदेत उत्कृष्ट विभागप्रमुख ,उत्कृष्ट विभाग ,उत्कृष्ट प्लेसमेंट ऑफिसर ,उत्कृष्ट प्रकल्प असे विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले . 
विदयापीठाचे कुलसचिव डॉ . जी आर . मंझा ,   कॅाम्प्युटेशनल सायन्सेस संकुलाचे संचालक आर ए हेगडी यानी डॉ मेंते व अजिंक्या याच्या  यशाबद्द्ल त्यांचे अभिनंदन केले . 

 

Related News