News Updates

सोलापूर विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलात  राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धा

स्योलापूर - सोलापूर विद्यापीठातील रसाायनशास्त्र संकुलात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते..यामध्ये वकृत्व ,वादविवाद आणि सामान्य ज्ञान आदि स्पर्धांचा समावेश होता .यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे महिंद्रा टायर्सचे व्यवस्थापक प्रभुलिंग झुंजा उपस्थित होते .
वक्तृत्व स्पर्धेमध्ये भारत २०२० अपेक्षा आणि वास्तव ,शिक्षणाचे खाजगीकरण ,इतिहास किवा भविष्य,विकसित गाव किंवा विकसित शहर ,कृत्रिम बुध्दिमत्ता आदि विषयांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये एकूण १३ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता . या स्पर्धेसाठी  डॉ. प्रभाकर कोळेकर आणि आर. एस. हेगडी यानी परिक्षक म्हणून काम पाहिले.
 वादविवाद स्पर्धेसाठी समाज माध्यमे ,अपेक्षा आणि वास्तव ,एक मत एक राष्ट्र , भारतातील उच्च शिक्षण व्यवस्था आदी विषयाचा समावेश होता . सदर स्पर्धेचे परीक्षण डॉ.रवींद्र चिंचोलकर व प्रभुलिंग झुंजा याने केले या स्पर्धेत १९ स्पर्धकानि सहभाग नोंदविला . सामान्य ज्ञान चालु घडामोडी सोबत विज्ञानवर आधारित प्रश्नाचा समावेश होता . या स्पर्धेत १८ स्पर्धकानी सहभाग नोंदविला . व्ही. पी. धुळप व सी. जी. गारडी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले . विजेत्या स्पर्धकाना डी. बी. एफ. दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. पी.उबाळे याच्या  हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले . 
यावेळेस रसायनशास्त्र संकुलाचे संचालक प्रा ए .ए. घनवट , डॉ. आर.बी. भोसले , डॉ. एम. जी.माळी, डॉ. एस एन शिंगारे , डॉ. व्ही. डी. कडू आदिनी परिश्रम घेतले.

Related News