News Updates

चित्रकला हा भावनांचा आविष्कार - सचिन खरात

सोलापूर - भाव - भावनांना वाट करून देणारी कला म्हणजे चित्रकला. भारतीय चित्रकलेचा उगम अगदी प्राचीन काळी झाला त्यामुळे पूर्वी संवादासाठी चित्रकलेचा वापर केला जात असे. त्यामुळे आजही प्राचीन काळी भिंतीवर ,दगडावर चित्रे कोरलेली दिसतात. अजिंठा वेरूळ या ठिकाणची कोरलेली चित्रे ही निस्वार्थी स्वरूपाची आहेत असे मत ख्यातनाम चित्रकार सचिन खरात यांनी व्यक्त केले.

          सोलापूर विदयापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलातील इतिहास व पुरातत्व शास्त्र विभागाच्या वतीने 28 फेब्रुवारी 2018 रोजी भारतीय चित्रकला विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.

          पुढे बोलताना खरात म्हणाले की,  आजच्या पालकांनी आपल्या मुलांमधील चित्रकला संबंधी गुणांना वाव देऊन मुलांना विविध चित्रकला स्पर्धात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.  कारण इतर क्षेत्रांप्रमाणे चित्रकला क्षेत्रातही करियर करण्याची मोठी संधी आहे.  या वेळस खरात यांनी भारतीय प्राचीन चित्रकलेत वापरलेल्या सांकेतिक चिन्हांचा अर्थ आणि महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा ज्ञानेश्वरी हजारे यांनी केले तर आभार  विभाग प्रमुख डॉ. माया पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी आणि इतिहास प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related News