News Updates

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे   विदयापीठात तीन कार्यशाळांचे आयोजन

सोलापूर - महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाच्या संयुक्त विदयमाने सामाजिक शास्त्रे संकुलात आवाजाची कार्यशाळा, संहितालेखन कार्यशाळा आणि व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा या तीन कार्यशाळांचे आयोजन 5 ते 24 फेब्रुवारी 2020 दरम्यान करण्यात येणार आहे.

यासंदर्भात सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. जी.एस. कांबळे यांनी कळविले आहे की, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयचे संचालक बिभिषण चवरे यांनी नाटय शिबिराअंतर्गत तीन कार्यशाळा आयोजित करण्यास मान्यता दिली आहे. या तीनही कार्यशाळा निशुल्क असून त्यात प्रत्येकी 20 विदयार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यशाळेत मान्यवर तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळांसाठी शिबिर संचालक म्हणून मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर तर समन्वयक म्हणून डॉ. अंबादास भासके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यात 5 ते 11 फेब्रुवारी दरम्यान आवाजाची कार्यशाळा, 12 ते 17 फेब्रुवारी दरम्यान संहिता लेखन कार्यशाळा तर 18 ते 24 फेब्रुवारी दरम्यान व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेसाठी 15 ते 35 या वयोगटातील विदयार्थ्यांना प्रवेश घेता येईल. प्रत्येक कार्यशाळेसाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागणार आहे. निवड समितीमार्फत पात्र विदयार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. इच्छुक विदयार्थ्यांनी विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागात उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यशाळांच्या अधिक माहितीसाठी समन्वयक डॉ. अंबादास भासके ( मो- 9822883978 ) यांच्यासमवेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related News