News Updates

  प्रा. संतोष पवार यांच्या व्याख्यानाने विदयापीठातील पत्रकारिता सप्ताहास प्रारंभ

सोलापूर - मराठी पत्रकार दिनाच्या अनुषंगाने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने पत्रकारिता सप्ताहास प्रारंभ झाला आहे यात डिजिटल पत्रकारिता, पर्यावरण पत्रकारिता, टेलिव्हिजन पत्रकारिता आणि अँकरिंग चार  विषयांवर राज्यस्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

या ‘पत्रकारिता सप्ताहास’ मराठी पत्रकार दिन 6 जानेवारी 2020 रोजी सकाळी प्रारंभ झाला. मास कम्युनिकेशन विभागात सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. जी.एस. कांबळे यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी पुरातत्वशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश व्हनखडे, संगमेश्वर महाविद्यालयातील प्रा. संतोष पवार, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ.रवींद्र चिंचोलकर, डॉ. अंबादास भासके, तेजस्विनी कांबळे, नितीन शिंदे आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. संतोष पवार यांचे ‘इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे तंत्र’ या विषयावर व्याख्यान झाले. या व्याख्यानात प्रा. पवार यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमाची विविध तंत्रे सांगून त्यासाठी लेखन कसे करावे हे प्रात्यक्षिकांसह  दाखवले.

दिनांक 7 जानेवारी 2019 रोजी ‘डिजिटल पत्रकारिता व समाज माध्यमे’ या विषयावर कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी हिंदुस्तान टाइम्स चे संपादक विश्वनाथ गरुड (पुणे),   योगेश बोराटे (पुणे), ई टीव्ही भारतचे सोलापूर प्रतिनिधी संतोष पवार, शिवाजी विदयापीठ कोल्हापूरच्या पत्रकारिता विभागाच्या प्रमुख डॉ. निशा पवार, याच विभागाचे डॉ .शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे यांची देखील व्याख्याने होणार आहेत.या कार्यशाळेचे आयोजन सुसंवाद या पत्रकारिता विभागाच्या माजी विदयार्थ्यांच्या संघटनेने केले आहे

8 जानेवारी 2019 रोजी सोलापूर विज्ञान केंद्र, सोलापूर तसेच  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विदयमाने ‘पर्यावरण पत्रकारिता’ कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.  सदरील कार्यशाळेमध्ये दैनिक सकाळचे सहयोगी संपादक सुनील माळी (पुणे),  सेंटर फॉर एनविरोन्मेंटल एज्युकेशचे माहितीपट निर्माते  स्वप्निल बोराडे, माहितीपट निर्माती शिल्पा बल्लाळ,  तसेच दैनिक लोकमतचे पर्यावरण पत्रकार समीर इनामदार, दैनिक दिव्य मराठीचे पर्यावरण पत्रकार विनोद कामतकर इत्यादींची व्याख्याने होणार आहेत.

दिनांक 10 जानेवारी 2020 रोजी पत्रकारितेतील नवे प्रवाह या विषयावर कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्र टाइम्स ( मुंबई)चे वरिष्ठ संपादक विजय चोरमारे,  साम टीव्ही ( मुंबई)च्या पत्रकार सोनाली शिंदे,  दैनिक सुराज्य चे संपादक राकेश टोळ्ये,  दैनिक सकाळचे सहयोगी  संपादक अभय दिवाणजी, तरुण भारतचे  निवासी संपादक विजयकुमार पिसे, पुढारीचे ब्युरो चिफ विजयकुमार देशपांडे ,पुण्यनगरीचे ब्युरो चिफ रघुवीर शिराळकर, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदींची व्याख्याने होणार आहेत.

दिनांक 11 जानेवारी 2020 रोजी  अँकरिंग तसेच डॉक्युमेंट्री मेकिंग या विषयावर कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत साम टीव्ही ( मुंबई)च्या पत्रकार सोनाली शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळांचा लाभ जास्तीत जास्त व्यक्तींने घ्यावा असे आवाहन पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ रवींद्र चिंचोळकर सामाजिक शास्त्र संकुलाच्या संचालक गौतम कांबळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. अंबादास भासके (9822883978 ) अथवा प्रा. तेजस्विनी कांबळे ( 98600 67388)यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related News