News Updates

लष्कराला जनतेचे नैतिक पाठबळ मिळवून देण्यासाठी  जनसंपर्क आवश्यक

सोलापूर – लष्कराला कोणतेही युध्द जिंकायचे असेल तर देशातील जनतेचा नैतिक पाठिंबा असणे गरजेचे असते. यासाठीच भारतीय लष्कर जनसंपर्काला विशेष महत्व देते असे मत कर्नल ( निवृत्त ) विनायक तांबेकर यांनी व्यक्त केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठातील  सामाजिक शास्त्रे संकुलात ‘ संरक्षण क्षेत्रासाठी जनसंपर्क या विषयावर द2नांक 28 सप्टेंबर 2019 रोजी आयोजित करण्यात आलेल्या याख्यानात ते बोलत होते. मास कम्युनिकेशन विभागातील ‘ यंग कम्युनिकेटर्स क्लब’ च्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर विभाग प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर. सहायक प्राध्यापक डॉ. अंबादास भासके व तेजस्विनी कांबळे, नितीन शिंदे यांची उपस्थिती होती.

 संरक्षण क्षेत्राच्या जनसंपर्काचे कार्य करण्याची संधी मला दहा वर्षे लाभली   असे सांगून  कर्नल तांबेकर म्हणाले की , जनसंपर्क नेहमी सत्यावरच आधारलेला असला पाहिजे. भारतीय लष्करातर्फे दरवर्षी वार्षिक अहवाल प्रसिध्द केला जातो तसेच सैनिक समाचार हे नियतकालिक प्रसिध्द केले जाते. विदयार्थ्यांनी व नागरिकांनी त्यांचे वाचन नियमित करायला हवे.   

संरक्षण क्षेत्रात महिलांना खूप संधी आहेत मात्र त्याची पुरेशी माहिती जनतेपर्यंत पोहोचत नाही याविषयी खंत व्यक्त करताना कर्नल तांबेकर म्हणाले की खाजगी माध्यमे लष्कराच्या संदर्भातील चांगली माहिती जनतेपर्यंत पोहोचवित नाहीत. ज्या परिसरातील जनतेला युध्दांची झळ बसली आहे, तेथील जनतेला लष्कराच्या कार्याचे महत्व पटलेले असते व्‍ त्या भागातील लोक लष्करी जवानांना खूप आदराची वागणूक देतात.

विदयार्थ्यांच्या विविध प्रश्नांना कर्नल तांबेकर यांनी मनमोकळेपणे उत्तरे दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की , सरकारने माध्यमांना पुरेसे स्वातंत्र्य दिले पाहिजे. प्रसार भारतीच्या स्थापनेनंतर आकाशवाणी व दूरदर्शनला अपेक्षित असलेली स्वायत्तता अजूनही मिळालेली नाही.

 कार्यक्रमाच्या प्रारंभी विभाग प्रमुख डॉ रवींद्र चिंचोलकर यांनी प्रासाव्‍2क केले.  तेजस्विनी कांबळे यांनी स्वागत केले. डॉ. अंबादास भासके यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Related News