News Updates

सामाजिक शास्त्रे संकुलाच्या दशकपूर्तीचा समारोप

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाच्या दशकपूर्ती सोहळ्याचा समारोप शनिवार दिनांक 27 एप्रिल 2019 रोजी माजी विदयार्थ्यांच्या मेळाव्याने होत आहे. 

विदयापीठाच्या मुख्य सभागृहात सकाळी 11 वाजता या मेळाव्यास प्रारंभ होणार आहे. कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सामाजिक शास्त्रे संकुलाची सुरुवात 2009-10 पासून झाली. या संकुलाच्या दशकपूर्तीनिमित्त वर्षभरात दहा कार्यक्रमांचे आयोजन संकुलात करायचे असा संकल्प आम्ही केला होता. प्रत्यक्षात 20 पेक्षा अधिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले अशी माहिती संकुलाचे संचालक प्रा.डॉ. जी.एस. कांबळे यांनी दिली. या कार्यक्रमास सर्व माजी विद्यार्थी, पीएच.डी.संसोधन पूर्ण केलेले संशोधक यांनी उपस्थित रहावे  असे आवाहन त्यांनी केले आहे.

जून 2018मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या तसेच कॅम्पस इंटरव्हू मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाने या दशकपूर्ती सोहळ्यास सुरुवात झाली आणि  माजी विद्यार्थी मेळाव्याने सोहळ्याचा समारोप होत आहे.या  समारोप कार्यक्रमात सुवर्णपदकासाठी देणगी देणा-या देणगीदारांचा सत्कार करण्यात येणार आहे, माजी विद्यार्थी संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे, माजी विद्यार्थ्यांच्या मनोगतातून त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. संकुलाच्या वाटचालीचा आढावा घेऊन नवीन संकल्पांची माहिती दिली जाणार असल्याचेही डॉ, कांबळे यांनी सांगितले.

मागील वर्षभरात  रुरल डेव्हलपमेंट विभागातर्फे ग्रामीण उद्योजक महिलांचा सत्कार, पुरातत्वशास्त्र विभागातर्फे नरखेड येथे उत्खनन, ऍग्रो टूरिझम अभ्यासक्रम उदघाटन समारंभ, अर्थशास्त्र विभागातर्फे अर्थसंकल्पावर चर्चासत्र , शेअर मार्केट अभ्यासक्रमाचे उदघाटन हे कार्यक्रम घेण्यात आले. जनसंज्ञापन विभागातर्फे माध्यमांसाठी नवतंत्रज्ञान कार्यशाळा, विकीपिडीया कार्यशाळा, विज्ञान पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याशिवाय गुणवंत, विदयार्थी सत्कार समारंभ, उद्योजकतेवर व्याख्यान, मानवाधिकार विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा,नेट - सेट मार्गदर्शन कार्यशाळा असर सर्वेक्षण, मतदान जागृती कार्यशाळा, पथनाटय स्पर्धा, शॉर्ट फिल्म स्पर्धा असे कितीतरी उपक्रम घेण्यात आले. याशिवाय विद्यापीठाच्या विविध उपक्रमात संकुलातील अध्यापकांनी समन्वयक म्हणून कार्य करुन तेा महत्वपूर्ण उपक्रम यशस्वी केले. यात अमेरिकेचा अपरिचित इतिहास व अणुउर्जा यावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या समन्वयाचे काम डॉ. माया पाटील व डॉ. प्रकाश व्हनकडे यंनी केले, युवास्पंदन सांस्कृतिक महोत्सवाचे समन्वयक म्हणून डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी काम केले, विद्यापीठात प्रथमच आयोजित रिफ्रेशर कोर्सचे समन्वयक म्हणून डॉ. प्रकाश व्हनकडे व सहसमन्वयक म्हणून डॉ.अंबादास भासके यांनी काम केले.

या वर्षभरात संशोधानाच्या क्षेत्रातही संकुलाने मोालाची कामगिरी केली. उजनीच्या पाण्याबाबत संचालक प्रा.डॉ. जी.एस. कांबळे यांनी संशोधन प्रकल्प हाती घेतला, पुरातत्वशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील यांच्या संशोधन प्रकल्पास रुसा मार्फत 1 कोटी 60 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले. मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॅ, रवींद्र चिंचोलकर यांच्या संशोधन प्रकल्पास आय.सी.एस.एस.आर. व्दारे 8 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

 संकुलातील चारही विभागातील विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. कला, क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांमध्ये अनेक महत्वपूर्ण पारितोषिकेही मिळविली.

Related News