News Updates

पर्यावरणशास्त्र विभागातर्फे 25 मार्चरोजी जलसाक्षरता कार्यशाळेचे आयोजन

सोलापूर - जागतिक जल दिनाच्या औचित्याने पर्यावरण शास्त्र विभाग, भूशास्त्र संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व ड्रीम फौंडेशन संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 25 मार्च 2019 रोजी एकदिवसीय राष्ट्रीय जल साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे उदघाटन सकाळी 11 वाजता विद्यापीठ सभागृहात होणार असून उदघाटक म्हणून

बसवराज बिराजदार, जिल्हा कृषी अधिक्षक,सोलापूर यांची उपस्थिती लाभणार आहे. अध्यक्षस्थानी

कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस असणार आहेत. या कार्यशाळेत डॉ.लालासाहेब तांबडे,वरिष्ठ वैज्ञानिक कृषी विज्ञान केंद्र . रमेश खाडे ,अभियंता, डॉ.डी.टी. मेश्राम, वरिष्ठ वैज्ञानिक,डाळिंब संशोधन केंद्र,सोलापूर, डॉ.अरुणा शिरपूडे गजबये, संचालक,आय.जी.एन. सी. ए. गोवा , डॉ.रविंद्र गजबये ,संचालक साद व ट्रेनर तथा मार्गदर्शक पाणी फाऊंडेशन नागपुर हे प्रमुख वक्ते आहेत.

कार्यक्रमास प्रा.डॉ.आर.बी.भोसले. प्र. संचालक,भूशास्त्र संकुल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सदर कार्यक्रम विद्यार्थी , संशोधक, अध्यापक, पर्यावरणप्रेमी, नागरिक या सर्वांसाठी खुला असून या कार्यशाळेचा लाभ जास्तीत जास्त व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन संयोजक डॉ.विनायक धुळप.पर्यावरण शास्त्र, विभाग प्रमुख तसेच  काशिनाथ भतगुणकी, अध्यक्ष,ड्रीम फौंडेशन यांनी केले आहे.

 

Related News