News Updates

पथनाटय स्पर्धेत दयानंद महाविदयालयाचा संघ प्रथम

सोलापूर – सोलापूर विदयापीठ, सोलापूर आणि जिल्हा निवडणूक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विदयमाने लोकशाही पंधरवडयानिमित्त विदयार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पथनाटय स्पर्धेत दयानंद महाविदयालयाच्या संघाने प्रथम तर लघुपट स्पर्धेत सोलापूर विदयापीठातील भूशास्त्र संकुलाच्या केदार मलाडे याच्या लघुपटास प्रथम येण्याचा मान मिळाला. या स्पर्धेतील विजेत्यांना मंगळवार दिनांक 12 फेब्रुवारी 2019 रोजी विदयापीठात पारितोषिके देण्यात येणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या आवाहनानुसार सोलापूर विदयापीठ आणि जिल्हा निवडणूक तथा जिल्हाधिकारी कार्यालय , सोलापूर यांच्या संयुक्त विदयमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने महाविदयालयीन व विदयापीठातील विदयार्थ्यांसाठी 9 फेब्रुवारी 2019 रोजी पथनाटय आणि लघुनाटय स्पर्धा घेतली. यातील पथनाटय स्पर्धेत डी.बी.एफ. दयानंद महाविदयालयाच्या संघास प्रथम, सोशल महाविदयालयाच्या संघास व्दितीय तर सामाजिक शास्त्रे संकुल, सोलापूर विदयापीठाच्या आणि शिवदारे फार्मसी महाविदयालयाच्या संघास तृतीय पारितोषिक विभागून जाहीर झाले.

लघुपट स्पर्धेत सोलापूर विदयापीठाच्या भूशास्त्र संकुलातील केदार मलाडे याच्या ‘राष्ट्रीय कर्तव्य’ या लघुपटास प्रथम, सामाजिकशास्त्रे संकुलातील प्रशांत शिंगे यांच्या ‘माझे कर्तव्य’ या लघुपटास व्दितीय तर भूशास्त्र संकुलातील शाम मडिवाळ याच्या ‘मतदानाचा पॅटर्न’ या लघुपटास तृतीय पारितोषिक जाहीर झाले. या संघ सहभागी झाले होते.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अश्विनी तडवळ्कर आणि जाकीरहुसेन पीरजादे यांनी काम पाहिले. याप्रसंगी बोलताना अश्विनी तडवळकर म्हणाल्या की या पथनाटयातून आणि लघुपटातून मतदार जागृतीचा संदेश दिला जात आहे. या दोन्ही स्पर्धांमधील विदयार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृती आशयाच्या दृष्टीने आणि सादरीकरणाच्या संदर्भाने दर्जेदार आहेत. जाकीरहुसेन पीरजादे म्ह्णाले की पथनाटयात वेगळेपण अनुभवता आले. लगुपटाच्या बाबतीत सोलापूर पुढे असल्याचा प्रत्यय या स्पर्धेतूनही आला. प्रारंभी मास कम्युनिकेशन विभगाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी स्पर्धेचा तपशील जाहीर केला . तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

Related News