सोलापूर विदयापीठातर्फे दिनांक 5 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता ‘लोकशाही आणि निवडणुका’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उदघाटन महाराष्ट्रातील राज्य निवडणूक आयोगाचे सचिव"> सोलापूर विदयापीठातर्फे दिनांक 5 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता ‘लोकशाही आणि निवडणुका’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उदघाटन महाराष्ट्रातील राज्य निवडणूक आयोगाचे सचिव"/>

News Updates

5 फेब्रुवारीस सोलापूर विदयापीठात  लोकशाही आणि निवडणुका यावर चर्चासत्र

सोलापूर –सोलापूर विदयापीठातर्फे दिनांक 5 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता ‘लोकशाही आणि निवडणुका’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उदघाटन महाराष्ट्रातील राज्य निवडणूक आयोगाचे सचिव श्री. किरण कुरुंदकर यांच्या हस्ते होणार आहे.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विदयापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले उपस्थित राहणारआहेत. या चर्चासत्रात सोलापूर महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे, राज्य निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरे हे उपस्थित राहणार आहेत. चर्चासत्राचा समारोप प्रकुलगुरू डॉ. एस.आय.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

 राज्य निवडणूक आयोगाच्या आवाहनानुसार दिनांक 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2019 दरम्यान राज्यात लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने सोलापूर विदयापीठाने आणि संलग्नित महाविदयालयांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून सोलापूर विदयापीठाने दिनांक 5 फेब्रुवारी 2019 रोजी ‘लोकशाही आणि निवडणुका’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन केले आहे. हे चर्चासत्र विदयापीठाच्या सभागृहात सकाळी 10.30 वाजता सुरू होणार आहे. विदयापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन संकुलाच्या वतीने मतदार जागृती या विषयावरील पोस्टर स्पर्धेतील सहभागी विदयार्थ्यांनी  तयार केलेल्या पोस्टर्सचे प्रदर्शन देखील सदर दिवशी होणार आहे. त्याचप्रमाणे काही महाविदयालयाचे विदयार्थी याप्रसंगी मतदार जागृती संदर्भात पथनाटयाचे सादरीकरण करणार आहे,मतदार जागृती च्या संदर्भात शॉर्ट फिल्मचे सादरीकरणही होणार आहे.  या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी डॉ. रविंद्र चिंचोलकर , विभागप्रमुख पत्रकारिता  विभाग, सोलापूर विदयापीठ ( मो - 9860091855 ) यावर संपर्क साधावा. या चर्चासत्रात जास्तीत जास्त विदयार्थी व अध्यापकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन विदयापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. बी. घुटे यांनी केले आहे.

Related News