News Updates

अध्यापकांनीही नवीन कौशल्ये आत्मसात करावित

सोलापूर - उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात जे नवीन बदल होत आहेत ते बदल विदयार्थी केंद्रित असून या बदलाच्या कालखंडात विदयार्थी तसेच अध्यापकांनी सुद्धा नवीन कौशल्ये आत्मसात करायला हवीत असे मत सोलापूर विदयापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा ), महाराष्ट्र आणि सोलापूर विदयापीठातील अंतर्गत गुणवत्ता व प्रमाणीकरण कक्ष ( आय.क्यू.ए.सी.) यांच्या संयुक्त विदयमाने दिनांक 22 जानेवारी 2019 पासून सोलापूर विदयापीठ आणि संलग्न महाविदयालयातील अध्यापकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. 24 जानेवारी 2019 रोजी विदयापीठाच्या मुख्य सभागृहात हा समारोप समारंभ झाला. यावेळी मंचावर डॉ. भरत कानगुडे, डॉ. चंद्रकांत रावल, रुसा महाराष्ट्रचे सल्लागार डॉ. पी.एन. पाबरेकर, या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. आर.एस.हेगडी उपस्थित होते. या प्रसंगी पुढे बोलताना कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या की शैक्षणिक क्षेत्रातील बदलामुळे खूप काही नवीन माहिती मिळत आहे याचे समाधान वाटते. या संधीचा फायदा घेऊन विदयार्थी, अध्यापकांनी नवीन तंत्रज्ञान, नवीन पद्धती आत्मसात कराव्यात.

 या कार्यक्रमात बोलताना डॉ. भरत कानगुडे म्हणाले की नवीन पद्धती ऑनलाइन पद्धतीची असल्यामुळे ती समजून घेणे आवश्यक आहे. स्वयंमूल्यांकन  अहवाल सादर केल्यावर त्यात तीनपेक्षा अधिक त्रुटी आढळल्यास नव्याने  तो अहवाल सादर करावा लागतो असे त्यांनी सांगितले.

रुसा महाराष्ट्रचे सल्लागार डॉ. पाबरेकर म्हणाले की , नव्याने महाविदयालय, विदयापीठात रुजू होणा-या अध्यापकांनी प्रशिक्षण घेणे अधिक गरजेचे आहे. विदयापीठांनीही अशा प्रशिक्षणांवर भर दयावा. नॅक मूल्यांकन पध्दतीसाठी नवीन सॉफ्ट्वेअर तयार करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

 डॉ. चंद्रकांत रावल यांनी निकष क्रमांक तीनची माहिती दिली. नवीन मूल्यांकन प्रक्रियेत प्रत्येक निकष महत्त्वाचा आहे  असे सांगून ते म्ह्णाले संशोधन करताना त्या त्या परिसरातील समस्यांवर संशोधन करणे महत्वाचे ठरेल असे त्यांनी सांगितले.

तीन दिवसाच्या या कार्यशाळेत अनेक मान्यवरांची व्याख्याने झाली.  समारोप प्रसंगी सहभागी प्रतिनिधींपैकी डॉक्टर प्राचार्य डॉ. एस. बी.क्षीरसागर दयानंद शिक्षणशास्त्र महाविदयालय, सोलापूर प्रा. सविता वैदय, के.पी. मंगळवेढेकर संस्था, सोलापूर,डॉ. ध्यानप्पा मेत्री, संगमेश्वर महाविदयालय, डॉ. कुबेर ढोपे, पंढरपूर,  शशिकांत हिप्परगी सिंहगड महाविद्यालय यांची इत्यादींची मनोगते झाली. ही कार्यशाळा नॅकचे नवीन निकष समजून घेण्यास उपयुक्त ठरल्याचे त्यांनी सांगितले.

सूत्रसंचालन श्रद्धा दूधनीकर यांनी केले. याप्रसंगी प्रारंभी डॉ. हेगडी यांनी मान्यवरांचा सत्कार केला. प्रास्ताविक डॉ. सी.जी गार्डी यांनी केले यांनी केले आभार प्रदर्शन डॉ. हेगडे यांनी केले.

 ----------

Related News