News Updates

लोकशाही पंधरवडयानिमित्त पथनाटय व लघुपट स्पर्धा आयोजित

सोलापूर – सोलापूर विदयापीठ, सोलापूर आणि जिल्हा निवडणूक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विदयमाने लोकशाही पंधरवडयानिमित्त पथनाटय स्पर्धा आणि लघुपट स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही पंधरवड्यानिमित्त सोलापूर विदयापीठात व संलग्न महाविदयालयात विविध उपक्रम होत आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने आवाहन केले आहे की, दिनांक 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2019 दरम्यान राज्यात लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात यावा असे आवाह्न केले आहे. या कालावधीत मतदार जागृती तसेच लोकशाही, निवडणुका आणि सुशासन यासंदर्भात जनप्रबोधन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे असे राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. या अनुषंगाने सोलापूर विदयापीठ आणि जिल्हा निवडणूक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या सहकार्याने विदयापीठातील व महाविदयालयातील विदयार्थ्यांसाठी पथनाटय व लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धासाठी मतदार जागृती, मतदानाचे महत्व, लोकशाही आणि निवडणुका हे विषय देण्यात आले आहेत. या दोन्ही स्पर्धांमध्ये पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्यांना जिल्हा निवडणूक कार्यलयातर्फे आकर्षक रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.

पथनाटय स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-या संघाने  या पंधरवडयात पथनाटयाचे कमीत कमी पाच प्रयोग विविध ठिकाणी करणे आवश्यक आहे. पथनाटय दहा मिनिटांचे असावे व त्यात जास्तीत जास्त 10 विदयार्थ्यांना सहभाग घेता येईल. लघुपट स्पर्धेत एका विदयार्थी दिग्दर्शकाच्या नावे नोंदणी होईल मात्र प्रमाणपत्रे सर्व सहभागी विदयार्थ्यांना दिली जातील . या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विदयापीठ व महाविदयालयांच्या संघांनी 5 फेब्रुवारी 2019 पर्यंत प्रवेशिका, विभाग प्रमुख, मास कम्युनिकेशन विभाग, सोलापूर विदयापीठ, सोलापूर यांच्याकडे पाठवाव्यात, अंतिम स्पर्धा 8 फेब्रुवारी 2019 रोजी होईल. अधिक माहितीसाठी डॉ रवींद्र चिंचोलकर ( मो- 9860091855) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 विविध उपक्रम

 लोकशाही पंधवड्यानिमित्त  सोलापूर विदयापीठ आणि संलग्न महाविदयालयात व्याख्याने, निबंध स्पर्धा, रॅली , पोष्टर स्पर्धा, चर्चासत्र, स्थानिक स्वराज्य संस्थांना भेटी आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात जास्तीत जास्त विदयार्थी, अध्यापकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रभारी कुलसचिव प्रा. व्ही.बी. घुटे यांनी केले आहे.

 

Related News