News Updates

नॅक मूल्यांकन निकषातील बदल जाणुन घेणे गरजेचे

सोलापूर – नॅक मूल्यांकनाच्या निकषातील बदल जाणून घेणे महाविदयालये आण्‍2 विदयापीठासाठी महत्वाचे आहेच, त्याचबरोबर विदयार्थ्यांच्या गुणवत्तविषयक अपेक्षांच्या पूर्ततेकडेही लक्ष दिले जाणे आवश्यक हे असे मत कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा ), महाराष्ट्र आणि सोलापूर विदयापीठातील अंतर्गत गुणवत्ता व प्रमाणीकरण कक्ष ( आय.क्यू.ए.सी.) यांच्या संयुक्त विदयमाने दिनांक 22 ते 24 जानेवारी 2019 दरम्यान सोलापूर विदयापीठ आणि संलग्न महाविदयालयातील अध्यापकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उदघाटन करताना कुलगुरु डॉ. फडणवीस बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून रुसा महाराष्ट्रचे सल्लागार विदयापीठातील डॉ. पी.एन. पाबरेकर, डॉ. एम. आर. कुरुप, आय.क्यू.ए.सी. चे संचालक डॉ. रवींद्र हेगडी उपस्थित होते. विदयापीठाच्या मुख्य सभागृहात संपन्न झालेल्या कार्यशाळेच्या उदघाटन समारंभास विदयापीठातील विविध संकुलांचे संचालक, महाविदयालयांचे प्राचार्य, आय.क्यू.ए.सी.समन्वयक उपस्थित होते.

 याप्रसंगी डॉ. पाबरेकर यांनी रुसा महाराष्ट्रच्या कार्याची माहिती दिली. नॅकने निकषात केले बदल प्रारंभी थोडे कठीण वाटले तरी ते समजून घेऊन प्रत्येक संस्थेला आवश्यक बदल करावे लागतील असेही त्यांनी सांगितले.

 डॉ. एम.आर. कुरुप म्हणाले की नॅकची नवी मूल्यांकन पध्दत ऑनलाईन स्वरुपाची आहे. यात डाटा मह्त्वाचा आहे.  जी माहिती सादर केली जाते ती पूर्ण व तपासण्यायोग्य असली पाहिजे. विदयार्थ्यांकडून थेट माहिती घेण्यावरही नॅकचा भर आहे. विदयार्थ्यांना मिळणा-या शिष्यवृत्ती, संस्थेचे गुणात्मक रँकिग, प्लेसमेंट इत्यादीला या निकषात अधिक महत्व आहे.

 प्रारंभी डॉ. हेगडी यांनी कार्यशाळा आयोजनाचा हेतू विषद केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. सी.जी. गार्डी यांनी करून दिला. आभार डॉ. विनायक धुळप यांनी केले आणि सूत्रसंचालन श्रद्धा दूधनकर यांनी केले.

या कार्यशाळेत सोलापूर विदयापीठ आणि संलग्न महाविदयालयातील 100 अध्यापक आयोजन झाले आहेत. पुढील दोन दिवसात डॉ. भरत कानगुडे, डॉ. चंद्रकांत रावल ( पुणे) हे तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 24 जानेवारी 2019 रोजी या कार्यशाळेचा समारोप होणार आहे.

Related News