News Updates

नॅक मानांकन निकषातील बदलाबाबत   सोलापूर विदयापीठात तीन दिवसीय कार्यशाळा

सोलापूर - राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा ), महाराष्ट्र आणि सोलापूर विदयापीठातील अंतर्गत गुणवत्ता व प्रमाणीकरण कक्ष ( आय.क्यू.ए.सी.) यांच्या संयुक्त विदयमाने दिनांक 22 ते 24 जानेवारी 2019 दरम्यान सोलापूर विदयापीठ आणि संलग्न महाविदयालयातील अध्यापकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे

विदयापीठ व महाविदयालयांचे मानांकन करणा-या नॅक या संस्तेने मानांकनाच्या निकषांमध्ये केलेल्या बदलांचे ज्ञान अध्यापकांना व्हावे या प्रमुख उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले अअहे. सोलापूर विदयापीठाच्या मुख्य सभागृहात 22 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता या कार्यशाळेचे उदघाटन होणार आहे. याप्रसंगी अध्यक्षस्थानी विदयापीठाचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून रुसा, महाराष्ट्राच्या राज्य संचालिका श्रीमती नीता राजीव लोचन, विदयापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एस.आय. पाटील तसेच रुसा महाराष्ट्रचे सल्लागार डॉ.पी.एन्‍.पाबरेकर हे राहणार आहेत.

नॅकने विद्यापीठ व महाविदयालयांचे मानांकन करण्यासाठी निर्धारित केलेल्या निकषात आमूलाग्र बदल केले असून हे बदल  जुलै 2017 पासून अमलात आणण्यात आले आहेत. हे बदल समजून घेण्यासाठी आणि त्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्यासाठी काय करावे लागेल याबाबत या काय्‍शाळेत तज्ञ व्यक्ती माग्‍दर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत विदयापीठ आणि महाविदयालयात अंतर्गत गुणवत्ता आणि प्रमाणीकरण कक्षाचे समव्यक म्हणून कार्य करणा-या अध्याप्कांनाच सहभागी करुन घेतले जाणार आहे. या कार्यशाळेत मुंबई येथील डॉ. एम.आर. कुरुप (मुंबई), डॉ. भरत कानगुडे, डॉ. चंद्रकांत रावल ( पुणे) हे तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेचा लाभ संबंधितांनी घ्यावा असे आवाहनन विदयापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.बी.घुटे आणि विदयापीठातील आय.क्यू.ए.सी. चे संचालक डॉ. रवींद्र हेगडी यांनी केले आहे.

Related News