News Updates

पन्नास मराठी वृत्तपत्रांची माहिती विकिपिडीयावर प्रकाशित करणार

सोलापूर – मराठी विकिपिडीयावर 50 मराठी वृत्तपत्राची संपूर्ण माहिती प्रकाशित करण्याच प्रकल्प सोलापूर विदयापीठाच्या पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाने हाती घेतला आहे.

मराठी भाषा पंधरवाडयाच्या निमित्ताने राज्य मराठी विकास संस्था, मुंबई, सेंटर फॉर इंटरनेट ऍण्ड सोसायटी आणि पत्रकारिता व जनसंज्ञापन्‍ विभाग, सामाजिक शास्त्रे संकुल, सोलापूर विदयापीठ यांच्या संयुक्त विदयमाने  11 जानेवारी 2019  रोजी आयोजित मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळेत  हा संकल्प करुन प्रत्यक्ष कार्यास प्रारंभ करण्यात आला. सेंटर फॉर इंटरनेट ऍण्ड सोसायटीचे समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी यासंदर्भात मार्गदर्शन केले. यात प्रथम सोलापूर जिल्हयातील वृत्तपत्रांची माहिती मिळवून , ती माहिती विकिपिडीयावर प्रकाशित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दिनांक 11 जानेवारी 2019 रोजी मराठी विकिपीडिया या विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळा सामाजिक शास्त्रे संकुलात संपन्न झाली. या कार्यशाळेत मराठी विकिपीडियावर नोंदी करुन त्या प्रकाशित कशा कराव्यात या संदर्भात सेंटर फॉर इंटरनेट सोसायटीचे समन्वयक सुबोध कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाचे विदयार्थी अध्यापक तसेच विदयापीठातील भाषाशास्त्र संकुलाचे अध्यापक तसेच संगमेश्वर महाविदयालयातील पत्रकारिता विभागाचे विदयार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेत विदयार्थ्यांना विकिपीडियावर संपादन कसे करावे यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी काय्‍शाळेची माहिती दिली. डॉ. अंबादास भासके यांनी परिचय करुन दिला, तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

Related News