News Updates

ग्रंथ हेच गुरु – सुहास पुजारी

सोलापूर –  ‘ग्रंथ हेच आपले गुरु’ मानून विदयार्थ्यांनी व्यासंग वाढविला तर त्यांना हव्या त्या क्षेत्रात यश मिळविणे सहज साध्य होऊ शकेल असे मत संगमेश्वर महाविदयालयातील मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सुहास पुजारी यांनी व्यक्त केले.

सोलापूर विदयापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्रात 10 ऑगस्ट 2018 रोजी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली, याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. याप्रसंगी मंचावर शैक्षणिक विकास व संशोधन विभगाचे विशेष कार्यासन अधिकारी डॉ. व्ही.बी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक डॉ. डी.डी.कुलकर्णी, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. व्ही.बी. घुटे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना कुलगुरु डॉ. फडणवीस म्हणाल्या की, विदयार्थ्यांनी अधिकाधिक वेळ ग्रंथालयात व्यतीत केला पाहिजे. ग्रंथालयाचा लाभ्‍ कसा घेता येईल हे त्यांनी विविध उदाहरणे देत स्पष्ट केले. ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. व्ही.बी. घुटे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात मेघाराणी देवकर तसेच पूजा खपाले या विदयार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. वरिष्ठ ग्रंथालय सहायक श्रीमती पी.एल. सावंत यांनी प्रास्ताविक केले. वरिष्ठ ग्रंथालय सहायक पी.एम.जावळे यांनी आभार मानले. दिपाली माने हिने सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रमास पी.एम.नळे, एस.डी.सूर्यवंशी, एल.एम. खरात या कर्मचा-यांसह विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Related News