News Updates

पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करा

सोलापूर- सोलापूर विदयापीठाचा दीक्षांत समारंभ नोव्हेंबर / डिसेंबर 2018 मध्ये संपन्न होणार असून या समारंभात पदवी / पदविका प्रमाणपत्र घेऊ इच्छिणा-या पात्र विदयार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन सोलापूर विदयापीठाच्या परीक्षा विभागातर्फे करण्यात आले आहे.

पदवी प्रमाणपत्रासाठी विदयार्थ्यांना 7 ऑगस्ट 2018 पासून ऑनलाईन अर्ज भरता येतील. अर्ज करण्याची अंतिम मुदत 12 सप्टेंबर 2018 पर्यंत असणार आहे.

 दरवर्षी सोलापूर विदयापीठाचा दीक्षांत समारंभ नोव्हंबर / डिसेंबर महिन्यात संपन्न होत असतो. ज्या विदयार्थ्यांना दीक्षांत समारंभात पदवी घ्यायची आहे, त्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी विदयापीठाकडे अर्ज करणे आवश्यक असते. यावर्षी विदयार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी  ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.  ज्या विदयार्थ्यांनी मार्च 2013 ते मे 2018 दरम्यान आपला अभ्यासक्रम उत्तीर्ण केला असेल त्यांना सहाशे रुपये शुल्क आकारण्यात येईल. ज्या विदयार्थ्यांनी मार्च 2005 ते डिसेंबर 2012 दरम्यान परीक्षा उत्तीर्ण केली असेल त्या विदयार्थ्यांना 900 रुपये शुल्क आकारले जाईल.

12 सप्टेंबर 2018 नंतर पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जाची हार्डकॉपी विदयापीठाकडे जमा करण्याची अंतिम मुदत 20 सप्टेंबर 2018 पर्यंत असणार आहे.

या दीक्षांत समारंभासाठी ज्या विदयार्थ्यांना पदवी / पदविका प्रमाणपत्रासाठी अर्ज करावयाचे आहेत त्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना आधार क्रमांकाची नोंद करणे अनिवार्य आहे. पदवी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्जाची हार्ड कॉपी जमा करताना त्यासोबत अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची प्रत, आधार कार्डाची प्रत तसेच शुल्क भरल्याची पावती जोडणे आवश्यक आहे.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी विदयार्थी सुविधा केंद्रात 0217-2744765 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे . ईमेलव्दारे convocation@sus.ac.in या पत्त्यावर तर व्हॉटसअपसाठी 9130013091 या क्रमांकावर संपर्क साधता येऊ शकेल.

Related News