News Updates

सोलापूर विद्यापीठामार्फत योग शिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम , प्रवेशासाठी आवाहन

सोलापूर - योग विषयाचे वाढलेले जागतिक महत्व व आरोग्याच्या दृष्टीने योग अभ्यासाकडे वाढत असलेला सामान्य लोकांचा ओढा पाहून सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राद्वारे एक वर्ष कालावधीचा ‘योग शिक्षक प्रमाणपत्र’ हा अर्ध वेळ अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. या अभ्आयासक्रम्नाचे प्रवेश सुरु झाले असून या आवाहनास प्रतिसाद देऊन प्रवेश घेण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

या अभ्यासक्रमास  प्रवेश घेण्यास १२ वी पास अथवा त्यावरील कोणतेही शिक्षण घेणारे विद्यार्थी/विद्यार्थिनी अथवा नोकरदार/व्यवसाय काम करणाऱ्या १८ वर्षांवरील व्यक्ती पात्र ठरतील. सदर अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचा असून दर आठवड्यातील शनिवार व रविवार सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ६ ते ८ अशा दोन वेळेत सोलापूर विद्यापीठाच्या रंगभवन जवळ असलेल्या अभ्यासकेंद्राच्या इमारतीत चालणार आहे. सदर अभ्यासक्रम हा मराठी भाषेत असून अभ्यासक्रमाची विस्तृत माहिती विद्यापीठ संकेतस्थळावर कौशल्य विकास केंद्राच्या लिंक वर उपलब्ध आहे.

सदर अभ्यासक्रमाचे शुल्क प्रती विद्यार्थी रु.५००० इतके असून ते दोन हफ्त्यात भरता येऊ शकेल. सदर अभ्यासक्रम हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम असल्याने या अभ्यासक्रमासाठी शासनाची कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती अथवा शुल्क सवलत लागू असणार नाही. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्या नंतर सोलापूर विद्यापीठ कौशल्य विकास केंद्राचे प्रमाणपत्र देण्यात येईल. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तीस भविष्यात मान्यता प्राप्त योग शिक्षक म्हणून काम करता येऊ शकेल तसेच स्वतःचे योगाचे वर्ग घेऊन योग प्रसाराचे कार्य करता येईल व अर्थाजन करता येऊ शकेल असे विदयापीठाच्या आवाहनात म्हटले ााहे.

सदर अभ्यासक्रमाचे प्रवेश दि. १ ऑगस्ट २०१८ पासून स्दुरु झाले असून ते .१६ ऑगस्ट २०१८ पर्यंत चालू राहणार आहेत. प्रवेशासाठी प्रथम येईल त्याला प्रथम प्रवेश या तत्वावर प्रवेश दिला जाईल. प्रवेश अर्ज विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र, सोलापूर विद्यापीठ येथे उपलब्ध असून अधिक माहिती साठी अभ्यासक्रम समन्वयक डॉ.अभिजित जगताप {संपर्क क्रमांक:९७३०१०५९६१/०२१७-२७४४७७४(१२६)} यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात येत आहे.

Related News