News Updates

माध्यम शिक्षणाबाबत चर्चा

 

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या  संज्ञापन व पत्रकारिता विभागातर्फे  माध्यम  शिक्षणाच्या संदर्भातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी  महाराष्ट्रातील विदयापीठातील माध्यम शिक्षण विभागाच्या प्रमुखांची बैठक 17 फेब्रुवारी 2018 रोजी आयोजित केली होती.

भारत सरकारच्या मनुष्यबळ विभागाने पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स ऍण्ड टिचिंग या योजनेअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठास टिचिंग लर्निंग सेंटर मंजूर केले आहे. त्याअंतर्गत माध्यम शिक्षणासंदर्भात या चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.याअंतर्गत यापुढेही प्रशिषण, चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती संज्ञापन व पत्रकारिता विभागाच्या प्रमुख उज्ज्वला बर्वे यांनी सांगितले.

 महाराष्ट्रातील विविध विदयापीठात व महाविदयालयात शिकविल्या जाणा-या माध्यम शिक्षणाच्या अभ्यासक्रमाबाबत यात सविस्तर चर्चा झाली. अभ्यासक्रमात काोणत्या सुधारणा करण्याची गरज आहे यावरही यात चर्चा झाली. या चर्चेत डॉ. किरण ठाकूर, डॉ. माधवी रेड्डी, प्रा.दीपक शिंदे ( नांदेड), डॉ. तुकाराम दौड ( जळगाव), डॉ. धर्मेश धावनकर ( नागपूर ), डॉ. निशा पवार ( कोल्हापूर) ,डॉ. रवींद्र चिंचोलकर ( सोलापूर), प्रा.संजय तांबट, प्रा.योगेश बोराटे, प्रा. विनय चाटी, प्रा. संदीप नरडीले, प्रा.नूतन कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Related News