News Updates

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत  विद्यार्थ्यांच्या माहितीपटास पुरस्कार

सोलापूर – किर्लोस्कर-वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवांतर्गत राष्ट्रीय स्तरावर झालेल्या माहितीपट व लघुपट स्पर्धेत सोलापूर विदयापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागातील ऋतुराज स्वामी आणि अनोज कदम या विदयार्थ्यांनी तयार केलेल्या  ‘ओढयाची शोकांतिका’ या माहितीपटास पुरस्कार प्राप्त झाला आहे.

पुणे येथे बालगंधर्व सभागृहात 4 जानेवारी 2018 रोजी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळयात आदित्य कौशिक यांच्या हस्ते ऋतुराज स्वामी याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.याप्रसंगी किर्लोस्कर उदयोगसमूहाचे अतुल किर्लोस्कर, आरती किर्लोस्कर, एस.नल्लामुथू, वीरेंद्र चित्राव, प्रणिता दांडेकर, गुरुमित सपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

किर्लोस्कर- वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सहकार्याने सोलापूर विदयापीठातील मास कम्युनिकेशन विभागाने ऑगस्ट 2017 मध्ये ‘ नदी आणि निगडित प्रश्न’  या विषयावर माहितीपट आणि लघुपट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतही ऋतुराज स्वामी आणि अनोज कदम यांच्या या माहितीपटास तृतीय पारितोषिक मिळाले होते. चित्रपट अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते 16 ऑगस्ट 2017 रोजी त्यांना पारितोषिक मिळाले होते.

किर्लोस्कर-वसुंधरा आंतरराष्ट्रीय पर्यावरण चित्रपट महोत्सवात देशभर सादर झालेल्या लघुपट व माहितीपट स्पर्धेतही  ऋतुराज स्वामी आणि अनोज कदम यांच्या ‘ ओढयाची शोकांतिका ‘ या माहितीपटास विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

सोलापूर शहरातील ओढयावर हा माहितीपट तयार करण्यात आला आहे.एकेकाळी स्वच्छ पान्याचास्त्रोत असलेल्या या ओढयाच्या दोन्ही बाजूस सोलापूर शहरातील पेठा वसल्या व शहर विकसित झाले . मात्र मानवी अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे या ओढयाचे घाणेरडया नाल्यात रुपांतर झाले. आता या ओढयाला शेळगी नाला म्हणून ओळखले जाते. या ओढयात अजूनही सोन्याचा शोध घेणारे लोक आहेत, त्यापेक्षा या ओढयाचे पुनरुज्जीवन व्हावे. या ओढयाला खळखळत्या स्चच्छ पाण्याचे पूर्वीचे रुप मिळवून दयावे अशी मांडणी यात करण्यात आली आहे.या माहितीपटाचे लेकनआणि दिग्दर्शन ऋतुराज स्वामी यांने तर चित्रिकरण अनोज कदम याने केले आहे.

या विदयार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या यशाबद्दल सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. इ.एन.अशोककुमार, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, प्रा. अंबादास भासके, प्रा. मधुकर जक्कन, प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.

Related News