News Updates

आर्किडचे विदयार्थी अभ्यास दौ-यासाठी स्वीडनला जाणार

सोलापूर - येथील आर्किडमहाविदयालयातील चार विदयार्थी व एक शिक्षक असे पाच जणांचे मंडळ 7 एप्रिल ते 23 एप्रिल पर्यंत स्वीडनच्या आभ्यास दौर्‍यावर जाणार आहेत.

एन के ऑर्किड अभियांत्रिकी महाविदयालयाने स्वीडनमधील टायरेसो आणि एन टी आय जी जिमन्याशिएट या दोन संस्थांबरोबर विदयार्थी आणि शिक्षक देवाण- घेवाण साठी सामंजस्य करार केलेला आहे. या अभ्यासादरम्यान अपारंपारिक ऊर्जास्त्रोत यांवर चालणारे प्रकल्प सादर करणार आहेत. स्वीडनची संस्कृती तेथील राहणीमान खानपान तसेच तेथील ऐतिहासिक स्थळांना विदयार्थी  भेटी देणार आहेत टायरेसो   जिमन्याशिएटमधील आठ विदयार्थी आणि 2 शिक्षक पारंपारिक ऊर्जा स्तोत्राचा अभ्यास करण्यासाठी जानेवारी महिन्यात पंधरा दिवसासाठी ऑर्किड महाविद्यालयात आले होते तसेच या दौऱ्यांमध्ये तांत्रिक आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण केली जाणार आहे.

           हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सचिव एन. एम. पाटिल, संचालिका लक्ष्मी कुमार, प्राचार्य डॉ जे बी दफेदार, आंतरराष्ट्रीय समन्वयक वैशाखी आणि विभाग प्रमुख प्रा. व्ही. एस. शिरवळ यांनी विशेष प्रयत्न केले.

 

Related News