News Updates

विद्यार्थ्यांनी तंत्र कौशल्यातून समाज विकासाला गती द्यावी : जयश्री माने

सोलापूर -अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणारे विदयार्थी हे उदयाच्या विकसित भारताचे कौशल्यसंपन्न अभियंते आहेत. या भावी अभियंत्यांनी अत्याधुनिक तंत्रकौशल्ये आत्मसात करून त्यातून समाज विकासाला गती दयावी, असे प्रतिपादन बीएमआयटी कॉलेजच्या संचालिका जयश्री माने यांनी केले.

ब्रह्मदेवदादा माने इ्स्टिटट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (बीएमआयटी) येथे शुक्रवारी (दि. ६) अभियांत्रिकी अंतिम वर्षाच्या प्रकल्प प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी स्कंस्थेचे अध्यक्ष दिलीपराव माने, तंत्रनिकेतनचे प्रााचार्य डॉ. विठठल राजमान्य , कॅम्पस  डायरेक्टर राहूल माने, प्रभारी प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, प्रकल्प प्रमुख प्रा. विशाल बगले, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. अनंत चिपडे, कॉम्प्युटर सायन्स विभागप्रमुख प्रा.श्रीपाद कुलकर्णी, इलेक्ट्रीकल विभागप्रमुख प्रा. सीमा शिर्षीकर, इ ॲन्ड टीसी विभागप्रमुख प्रा. शुभांगी काशिद, कॉम्प्युटर विभाग प्रतिनिधी प्रा. उषा दोडमिसे, प्रा. सचिन गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

इ ॲन्ड टीसी, मेकॅनिकल, इले्ट्रिरकल आणि कॉम्प्युटर सायन्स या चार विभागात मिळून एकूण ४२ तांत्रिक प्रकल्प विद्याथ्र्यांनी सादर केले. इ ॲन्ड टीसी विभागाच्या प्राजक्ता जाधव, शीतल जाधव, प्रवीणकुमार गुंड यांचा 'मानवी ताण तपासण्याची रचना आणि अंमलबजावणी', 'मेकॅनिकल'चे विद्यार्थी गौरव कुलकर्णी, अमर चुनाडे, राहुल कोरे, आप्पासाहेब शिंदे यांचा 'मेणबत्तीच्या उर्जेवर चालणारा पंखा', रोहित रेळेकर, मल्लिकार्जु बटगिरी, आकाश बावधनकर व रवीकिरण पतंगे यांचा 'पाण्यावर तरंगणाऱ्या कचऱ्याचे संकलन करणारे यंत्र' हे प्रकल्प सर्वांसाठी आकर्षणाचे ठरले. यासह इतर सर्व प्रकल्पही नावीण्यपूर्ण आणि समाजोपयोगी होते.

---

Related News