News Updates

शिक्षकांनी शिक्षणातील नवोपक्रम आत्मसात करावेत : डॉ. जगताप

सोलापूर -आपल्या देशातील अनेकविध भाषा, बोली असलेल्या संस्कृतीमध्ये सर्व समाजातील विदयार्थ्यांना एकत्रित शिकविणं हे शिक्षकांसमोरील खूप मोठं आव्हान आहे. हे आव्हानं तितक्याच नेटानं पेलत शिक्षकांनी बदलते नवोपक्रम आत्मसात करावेत. आणि अध्यापनात नवनवीन तंत्रांचा वापर करावा. त्यातून अध्ययन- अध्यापन प्रक्रिया आणखी सुकर होईल, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ डॉ. ह.ना. जगताप यांनी केले.

डी.पी.बी. दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयात गुरूवारी 'दयानंद- डॉ. मार्डीकर शिक्षक सक्षमता पुरस्कार' वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.बी.क्षीरसागर होते. प्राचार्य डॉ.व्ही.पी. उबाळे, प्राचार्या डॉ.कीर्ती पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य कृष्णाजी मार्डीकर यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार देण्यात येतात. यंदाच्या वर्षी तिल्हेहाळ येथील जि.प. शाळेतील शिक्षक जावीद शेख (रा. जामगाव), हर्षवर्धन प्रशाला तळहिप्परगे येथील संजय जवंजाळ आणि वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयातील चेतन तुपकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रत्येकी दोन हजार रूपये, शाल, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होतेे. सूत्रसंचालन अंजना सोनावणे यांनी, प्रास्ताविक अतुल मार्डीकर यांनी केले. पुरस्कार विजेत्यांचा परिचय डॉ.के.जे.शिंदे, डॉ. एल. व्ही.बामणे व ए.एस. गड्डम यांनी करून दिला. डॉ.व्ही.बी. किडगावंकर यांनी मानपत्र वाचन केले. आभार पी.आर. भोजे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

Related News