News Updates

छत्रपती शिवाजी नाईट महाविदयालयात  वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा

सोलापूर- सोलापूर येथील छत्रपती शिवाजी कला व वाणिज्य महाविदयालयात 12 मार्च 2018 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता राजर्षी शाहू सभागृहात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून  सोलापूर महानरपालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे उपस्थित राहणार आहेत . याप्रसंगी सोलापूर विदयापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड झालेले श्री. महेश माने, तसेच अधिसभा सदस्य म्हणून निवड झालेले डॉ .अनिल बारबोले व प्रा. सचिन गायकवाड यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. मनोहर सपाटे असणार आहेत. या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन   डॉ. अनिल बारबोले, यतीराज होनमाने, निवृत्ती केत, प्राचार्य डॉ. सुरेश पवार, प्रा. संतोष गवळी आदींनी केले आहे.

Related News