News Updates

उच्च शिक्षणक्षेत्रातील आव्हाने आणि संधी यावर बार्शी येथे राष्ट्रीय चर्चासत्र

सोलापूर – बार्शी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षणशास्त्र महाविदयालयाने 11 मार्च 2018 रोजी एक दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्राचे आयोजन केले आहे.

यासंदर्भात प्राचार्य डॉ.एस.एस.गोरे यांनी कळविले आहे की, या राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यासाठी  डॉ. हरीशंकर सिंग, विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर केंद्रीय विदयापीठ, लखनौ तसेच डॉ. मल्लिकार्जुन कनकट्टे  बसवेश्वर शिक्षणशास्त्र महाविदयालय, बीदर हे मान्यवर तज्ञ उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्रात सहभागी होऊन शोधनिबंध सादर करु इच्छिणा-यांना खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर शोधनिबंध सादर करता येतील यात अध्यापक शिक्षण कार्यक्रमातील आव्हाने आणि संधी, शारीरिक शिक्षण कार्यक्रमातील आव्हाने अणि संधी,उच्च शिक्षण संशोधनातील आव्हाने आणि संधी, उच्च शिक्षणातील आंतरविदयाशाखीय दृष्टीकोन आव्हाने आणि संधी ,उच्च सिक्षणातील मूल्यमापमन पध्दतीसमोरील आव्हाने. सर शोधनिबंध मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी एका भाषेत पाठविता येतील .शोधनिबंध cedmsd17@gmail.com या इमेलवर पाठवावेत.

या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी समन्वयक डॉ. एम.एस.डिसले ( 9503637817), डॉ.पी.ए.पाटील (9890627179), प्रा.पी.पी.नारळे ( 8600197276), डॉ.एम.व्ही.मते  ( 9881376700),प्रा. बी.टी.गुंड  ( 9881349887) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.    

Related News