News Updates

यशासाठी प्रमाणिक प्रयत्न करा - डॉ.व्ही.बी.पाटील

सोलापूर - बळ, इच्छा, योग्य दिशा, अभ्यासात सातत्य, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाची शिखरे गाठता येतात. यशप्राप्तीसाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज असते. असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाचे विशेष कार्यासन अधिकारी डॉ. व्ही.बी. पाटील यांनी केले. ते मंद्रुप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ या संस्थेचे अध्यक्ष पी. एल. कोळी होते. या वेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष डॉ. सी. जी.हाविनाळे, सचिव एम. डी. कमळे, विश्वस्त यु.बी.डांगे, प्राचार्य डॉ. बी. एम.भांजे, विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ .एस.एस. तोरवी आदी उपस्थित होते..

            या वेळी डॉ .पाटील पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये समाजाच्या मदतीची भावना असावी. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा. विजेता होण्यासाठी काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. गुणवान होण्यापेक्षा चारित्र्यवान होणे अधिक योग्य आहे.  या वेळी अध्यक्ष पी. एल. कोळी म्हणाले आजच्या गुणवंतांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार केल्यास अशक्य काहीच नाही. हेच विद्यार्थी पुढे प्रशासन सेवेत चमकतील.

             मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापक तसेच डी. लीट पदवी मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉॅ. भांजे यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. बी. एम.भांजे यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. प्रा डॉ. बी. एन. आदटराव यांनी गुणवंतांच्या नावाची उद्घोषणा केली.  

      यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ. डी. के. देडे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा जवाहर मोरे यांनी केले तर आभार जयश्री बगले यांनी मानले.

Related News