News Updates

महिलांचे प्रश्न सोडविण्यास प्रााधान्य हवे- भारती पाटील

बार्शी -  महिलांचे प्रश्न सोडविण्यास  प्राधान्य हवे असे मत शिवाजी विदयापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ भारती पाटील यांनी व्यक्त केले..श्री शिवाजी महाविदयालय बार्शी आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई यांच्या संयुक्त विदयमाने  27 फेब्रुवारी 2018 रोजी 'महिला सबलीकरण व स्रीपुरुष समानता' या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या..

या चर्चासत्राात महिलांविषयक राष्ट्रीय धोरणे, औद्योगिक क्षेत्राातील संधी, महिलांचे राजकीय,सामाजिक , आर्थिक, वैद्यकीय, वैज्ञानिक, संरक्षण क्षेत्राातील योगदान , भारतीय न्यायव्यवस्था, महिला बचत गट, महिलांवरील अत्याचार, महिला सबलीकरण आदी विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले..

  या चर्चासत्रातील बीजभाषणात धम्मसंगिनी रमा गोरख यांनी महिला सबलीकरणावर आपले परखड विचार मांडले. तसेच इतरही मान्यवर व्याख्यात्यांनीही महिलांसंदर्भातील विविध विषयांवर चर्चासत्रात प्रबोधन केले.महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या शिफारसीनुसार, शिवाजी महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती ग्रंथालय येथे 'महिला सबलीकरण व स्त्री पुरुष समानता' या विषयावर हे राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आले. त्यामध्ये नागपूरच्या डॉ. धम्मसंगिनी रमागोरख यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर प्रकाशझोत टाकला. तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. भारती पाटील यांनी स्त्री-पुरुष समानता यांवर सकारात्मकपणे चर्चा केली. सोलापूरच्या पोलीस उपनिरीक्षक कु.श्वेताली सुतार यांनी महिलांवरी हिंसांचारावर बोलताना पोलीस सेवेतील अनुभव कथन केले. त्यानंतर, बार्शीच्या अॅड. जगनाडे व्ही.एम यांनी महिलांविषयक कायदे समजावून सांगतिले. या चर्चासत्रात डॉ. स्मिता यादव आणि डॉ. ज्योती वाघमारे यांनीही महिला सक्षमीकरणाबाबत आपले मत मांडले. एकंदरीत या राज्यस्तरीय चर्चासत्रात महिलांविषयक प्रश्न, समस्या आणि सक्षमीकरणावर दिवसभर चर्चा झडली. 
या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी.वाय यादव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात हे होते. जवळपास 250 महिलांनी कार्यक्रमात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. तर, समारोपप्रसंगी डॉ. मीरा यादव या प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहिल्या. त्यावेळी चर्चासत्राच्या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात यांनी भूषविले. याप्रसंगी चर्चासत्र समन्वयक म्हणून सुमन लोखंडे यांनी तर चर्चासत्राचे सचिव म्हणून डॉ. व्ही.एस. गुरमे यांनी काम पाहिले.

Related News