News Updates

 शिवदारे महाविद्यालयात आयोजित काव्यमैफील रंगली.

सोलापूर -व्ही..जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स आणि थिंक टँक पब्लिकेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयात काव्यमैफीलीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी.एच. बासुतकर होते. यावेळी उपप्राचार्य प्रा. एम. बी. पाटील, प्रा. शुभदा शिवपुजे-उपासे, थिंक टँक पब्लिकेशनचे डॉ. बाळासाहेब मागाडे, प्रा. अमोल कोरे उपस्थित होते. 

काव्यमैफिलीत ज्येष्ठ कवी देवेंद्र औटी, विजय गायकवाड, सतिश गडकरी, कवयित्री मनिषा कोठे यांनी सहभाग घेतला. यावेळी औटी यांनी ‘माझी मराठी वाचवा’, ‘माणुस शोधतो मी’या  कविता सादर केल्या. विजय गायकवाड यांनी ‘माणुस जनावर झाला’ आणि ‘आजकालचे प्रेम’,  सतिश गडकरी यांनी ‘समर्पित’  आणि ‘हुतात्माचं स्वप्न’तर मनिषा कोठे यांनी ‘चिऊ ताई’या कविता सादर केल्या. कविता सादरीकरणाला विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे प्रकाशन झाले.

 

प्रास्ताविक प्रा. शुभदा शिवपूजे-उपासे यांनी केले. परिचय डॉ. बाळासाहेब मागाडे, सुत्रसंचालन प्रा. दामोदर बनसोडे यांनी  केले तर आभार प्रा.महादेव कांबळे यांनी मानले. 

यावेळी विद्यार्थी प्रतिज्ञा मासाळ, अश्‍विनी भरमशेट्टी, निकीता चौधरी, वर्षा कोळी, प्रथमेश पोरे यांनी मनोगते व्यक्त केली. 

सोलापूरी भाषेचा लहेजा प्रसिद्ध ः डॉ. बासुतकर

सर्वांना आपलेसे वाटणारे आणि आपलेसे करुन घेण्याचे माध्यम म्हणजे भाषा. भाषेवरूनच प्रत्येक व्यक्तीची स्वता:ची एक वेगळी ओळख निर्माण होत असते. महाराष्ट्रात जरी मराठी भाषा वापरली जात असली तरी त्यामधील विभीन्नतेमुळे समोरचा मनुष्य कोणत्या भागातील आहे हे त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे ओळखता येते. सोलापुरची भाषाशैली ही राज्यभर प्रसिध्द आहे. अशा या आपल्या मराठी भाषेचा अभिमान असल्याचे प्रतिपादन प्राचार्य पी. एच. बासुतकर यांनी केले.

Related News