News Updates

जलपर्णीवर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शोधला उपाय

सोलापूर - सोलापुरच्या कंबर तलाव म्हणून ओळखल्या जाणा-या संभाजी तलावातील जलपर्णी ही मोठी समस्या बनली आहे. मात्र सोलापूच्या स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील  विदयार्त्यांनी संशोधन करुन यावर उपाय शोधला आहे.

या महाविदयालयातील चार विद्यार्थानी जलपर्णी काढणाऱ्या स्कीमर मशीनची निर्मिती केली आहे. या मशीनच्या साहायाने एका फेरीत 250 किलो जलपर्णी गोळा केली जाऊ शकते. शुक्रवारी या  मशीनची संभाजी तलावात यशस्वी चाचणी घेण्यात आली. 32 दिवसात सुमारे 55 हजार रुपये खर्च करून बनवलेल्या या स्कीमर मशीनला जलपर्णीची राणी असे नाव देण्यात आले आहे.

         मेकॅनिकल डिप्लोमाच्या अंतिम वर्षातील सौरभ भोसले, विघ्नेश माने, विशाल कापसे आणि ओंकार आगवणे  या चार विद्यार्थ्यांनी ही मशीन बनवली आहे. त्यांच्या अभ्यासक्रमनुसार त्यांना एक प्रकल्प तयार करणे आवश्यक असते त्यामुळे या विद्यार्थ्यांनी समजाला उपयोगी होईल असा प्रकल्प तयार केला आहे. परदेशात ही यंत्रणा कशी बनवली गेली याची माहिती घेऊन त्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी ही स्कीमर मशीन बनवली आहे. ही मशीन हाताळण्यासाठी केवळ दोन माणसांची गरज भासते 

          सदर मशीन बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य हिंदुराव गोरे, प्रा नियमत मुल्ला यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या मशीन मध्ये जुन्या मोटार सायकलीचे इंजिन वापरले आहे. ते चेनने चाकला जोडून त्याला सरकती जाळी जोडली आहे. या जाळीला जागोजागी दीड ते दोन इंच आकारातील रॉड लावले आहेत. मशीन सुरु केल्यावर जाळी गोल फिरते आणि रॉड जलपर्णी वर ओढली जाते.चारही बाजूने पंख्याचे पाते बसवण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्यात गेल्यावर पात्याची चाके फिरतात आणि मशीन पुढे सरकत जाते. लोखंडी फ्रेमची स्कीमर मशीन ही  चारही बाजूने सहा हवाबंद बॅरलवर तरंगते आहे. या मशीनचे वजन 200 किलो आहे. स्कीमर माशीनमुळे कमी खर्चात जलपर्णी काढणे शक्य असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

Related News