News Updates

वालचंद महाविदयालयात भूगोलाची कार्यशाळा संपन्न

सोलापूर - भूमाहिती शास्त्र( जिऑइनफॉर्मेटिक्स ) अभ्यासक्रमची सुरुवात सर्वत्र जगभर झाली असून ती काळाची गरज मानली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, अन्यथा जगाच्या परिघाबाहेर फेकले जाण्याचा  इशारा सोलापूर विद्यापीठ भूगोल आभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. टी. एन. लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

       सोलापूर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या साहाय्याने वालचंद महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने 'फंडामेंटल्स ऑफ जी.आय. एस., जी. पी. एस ऍण्ड रिमोट सेनसिंग' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचेआयोजन करण्यात आले होते त्यावेळेस डॉ. टी. एन. लोखंडे बोलत होते.

    यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ चंद्रकांत चव्हाण, प्रा डॉ प्रकाश कोंका, समन्वयक डॉ आय.एन..धायगोडे उस्थित होते. 

      यावेळेस डॉ. लोखंडे यांनी दूर भागातून पृथ्वीच्या भूगर्भातील हालचालींचे परीक्षण करण्यासाठी रिमोट सेन्सिंगचा उपयोग कसा होतो, बदलत्या जगाच्या घडामोडीची व्याप्ती आधुनिक तंत्रज्ञानामुळे समजून घेणे किती सोपें झाले आहे. तसेच या तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनात प्रत्येकाला कसा  उपयोग होतो याची अनेक उदाहरणे विद्यार्थाना देत हे तंत्रज्ञान संपादन करणे विद्यार्थ्यांनसाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले

       प्राचार्य डॉ चंद्रकांत चव्हाण यांनी  टेक्नॉलॉजी फ्रेंडली युवा पिढी असा विद्यार्थ्यांचा उल्लेख करुन बदलत्या जगासोबत विद्यार्थ्यांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करून माहिती वाढवण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा ज्योती वाघमारे यांनी केले तर आभार डॉ पोपट माळी यांनी मानले सदर कार्यशाळेस मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग उपस्थित होता 

Related News