News Updates

मराठी भाषादिनी शिवदारे महाविद्यालयात काव्यमैफिल

कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी मराठी राजभाषा दिनानिमित्त व्ही.जी. शिवदारे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभाग व थिंक टँक पब्लिकेशन्स, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी निमंत्रितांच्या काव्यमैफिलीचे आयोजन केल्याची माहिती विभागप्रमुख प्रा. शुभदा शिवपुजे-उपासे यांनी दिली.

 

महाविद्यालयाच्या मराठी विभागात सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ कवी देवेंद्र औटी यांच्या अध्यक्षतेखाली व थिंक टँक प्रकाशनाचे संचालक डॉ. बाळासाहेब मागाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्‍या या  काव्यमैफीलीत कवी विजय गायकवाड, सतीश गडकरी, मनिषा कोठे सहभागी होतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी.एच. बासुतकर असतील. 

 

यावेळी ‘कवी कुसुमाग्रज’ विशेष भित्तीपत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते होईल. कवी संमेलनानंतर विद्यार्थ्यांची भाषणे, निबंध व वक्तृत्त्व स्पर्धा होतील. उपस्थित राहावे, असे  आवाहन प्रा. दामोदर बनसोडे यांनी केले आहे. 

Related News