News Updates

बी.एम.आय.टी.मध्ये रक्तदान शिबीर

सोलापूर- सोलापूर येथील ब्रम्ह्देवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी , सोलापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे 21 फेब्रुवारी 2018 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यात 102 जणांनी रक्तदान केले.

अनेक जीव वाचविण्यासाठी रक्तदानाचे महत्व आहे. ही बाब विचारात घेऊन या महविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्याने 21 फेब्रुवारी 2018 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात्त आले होते. प्रभारी प्राचार्य प्रा. आर.वाय. माने यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.यू.एस.दोडमिसे, विदयार्थी समन्वयक राहुल राठोड आदींनी हे शिबीर यसस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

Related News