News Updates

दयानंद महाविदयालयात शारीरिक तंदुरुस्तीवर राष्ट्रीय परीषद

सोलापूर- सोलापूर येथील डी.बी.एफ. दयानंद कला व शास्त्र महाविदयालयात शारीरिक तंदुरस्ती ( अवेअरनेस ऑफ फिजिकल फिटनेस ) या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील परीषद 21 फेब्रुवारी 2018 रोजी आयोजित करण्यात आली . या परिषदेचे उदघाटन डॉ.पी.एन.देशमुख , अध्यक्ष नॅशनल असोसिएशन ऑफ फिजिकल एज्युकेशन ऍण्ड स्पोर्टस सायन्स यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी मंचावर डॉ.ए.एम. मंजुनाथ, विभागप्रमुख, शारीरिक शिक्षण विभाग,युनिवर्सिटी कॅालेज ऑफ सायन्स, तुमकुर, कर्नाटक , डॉ. अभिजित जगताप, वैदयकीय अधिकारी, सोलापूर विद्यापीठ, प्राचार्य व्ही.पी.उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या परिषदेत डॉ. मंजुनाथ यांचे बीजभाषण झाले. डॉ. जगताप यांनीही मार्गदर्शन करताना आरोग्यासाठी व शारीरिक तंदुरुस्तीसाठी कशी काळजी घ्यावी याची माहिती दिली.प्राचार्य डॉ. उबाळे यांनी अध्यक्षीय भाषणात महाविदयालयाच्या महत्वपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. या परिषदेत विविध महाविदयालयातील अध्यापक विदयार्थी सहभागी झाले .

 

Related News