News Updates

कस्तुरबा शिक्षणशास्त्र महाविदयालयात संशोधन विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

 

सोलापूर-  कस्तुरबा शिक्षणशास्त्र महाविदयालय , सोलापूर आणि रिसर्च सेंटर , सोलापूर यांच्या संयुक्त विदयमाने स्टॅटिस्टिक्स इन सोशल सायन्स रिसर्च या विषयावर 26 फेब्रुवारी 2018 रोजी राष्ट्रीय स्तरावरील संशोधन परिषदसंपन्न झाली. यात विविध राज्यातील 300पेक्षा अधिक संशोधकांनी सहभाग घेतला. या परिषदेचे उदघाटन सोलापूर विदयापीठातील संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.व्ही.बी.घुटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रााचार्य डॉ. शिवकुमार गणापूर होेते.

या परिषदेत डॉ.एकनाथ एकबोटे, माजी विभागप्रमुख, शिक्षणशास्त्र विभाग , गुलबर्गा विदयापीठ, डॉ.मेघा उपलाने,सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ ,पुणे, डॉ.एस.बी.जेवळी , बेळगाव आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. डॉ.घुटे म्हणाले की, कोणत्याही विषयाचे संशोधन संख्याशास्त्राच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. डॉ.एकबोटे यांनी नमुना  निवडीचे महत्व व प्रकार विषद केले. डॉ. उपलाने यानी माहिती विश्लेषणात संख्याशास्त्राची मदत कशी होते ते स्पष्ट केले.डॉ. जेवळे यांनी संगणकाचा वापर करुन संख्याशास्त्रीय विश्लेषण कसे करावे याबाबत माहिती दिली. 

.या परिषदेच्य यशस्वितेसाठी  प्राचार्य डॉ.शिवकुमार गणापूर आणि समन्वयक डॉ.विदया भोसले यांनी केले आहे. डॉ.डी.एस.वाघमारे, डॉ.व्ही.जे.जोकारे आदींनी प्रयत्न केले.

Related News