News Updates

पंढरपुर सिंहगडच्या विद्यार्थ्यांचे शिवजन्मोत्सवा निमित्त वृक्षारोपण

 

●सामाजिक बांधिलकी म्हणून गार्डी मध्ये श्रमदान

लक्ष्मी दहिवडी (प्रमोद बनसोडे) छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन कोर्टी (ता. पंढरपुर) येथिल एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधिल विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांची जयंती हि श्रमदान व वृक्षारोपण करून गार्डी गावात साजरी केली असल्याची माहिती महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

             पंढरपुर सिंहगड महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी रोजी सिंहगड मध्ये प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले. यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थी छञपती शिवाजी महाराज यांची पालखी घेऊन गार्डी गावामध्ये गेले.

   गार्डी ग्रामपंचायत मध्ये मान्यवरांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज च्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये जि. प. सदस्य तानाजी वाघमोडे सह विद्यार्थी यांनी मनोगत व्यक्त केले. यादरम्यान शिवछञपती स्मरण या विषयावर प्रा. प्रशांत सरूडकर यांनी व्याख्यान दिले. 

               हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थी परिश्रम घेत असुन या कार्यक्रमासाठी प्रा. शिवाजी पवार, प्रा. शशीकांत गिड्डे, प्रा. महेश शिंदे, प्रा. सतिश बागल,  प्रा. अजिंक्य गायकवाड, प्रा. सचिन चव्हाण, दिंगबर वाघमारे, प्रभाकर शिंदे आदी सह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

Related News