News Updates

पत्रकारिता काल, आज आणि उद्या या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा

सोलापूर – पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि अभियांत्रिकी महाविद्यालय(स्वेरी), पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 28 ऑगस्ट 2018 रोजी पंढरपूर येथे ‘पत्रकारिता काल आज आणि उद्या’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

अभियांत्रिकी महविदयालय,  पंढरपूरच्या सभागृहात होणा-या या कार्यशाळेचे उदघाटन 28 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून निलेश खरे, संपादक साम टीव्ही मुंबई, रवींद्र आंबेकर संपादक, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई, युवराज मोहिते माद्यमतज्ञ, मुंबई हे उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी सागर कवडे तहसीलदार मधुकर बर्गे यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अभियांत्रिकी महाविदयालयवे प्राचार्य तथा , विदयापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे राहणार आहेत.

या कार्यशाळेत विविध सत्रात पत्रकारितेच्या क्षेत्रातील विविध पैलूंवर चर्चा होणार आहे. या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात वृत्तवाहिन्यांचे महत्त्व आणि मर्यादा या विषयावर निलेश खरे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राच्या अध्यक्षस्थानी पंढरी संचारचे संपादक बाळासाहेब बडवे असणार आहेत. दुसऱ्या सत्रात प्रिंट मिडिया चे भवितव्य या विषयावर युवराज मोहिते हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी दिव्य मराठीचे वरिष्ठ वृत्त संपादक श्रीकांत कांबळे असणार आहेत. तिसर्‍या सत्रात पर्यायी माध्यमांचे प्रयोग या विषयावर रवींद्र आंबेकर हे मार्गदर्शन करणार असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी सकाळचे सहयोगी संपादक अभय दिवाणजी हे राहणार आहेत. या कार्यशाळेसाठी शुल्क नाही मात्र नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी प्रा. करण पाटील 9595921154 , प्रा. हलकुडे 9545553628, प्रा. अंबादास भासके 9822883978 यांच्याशी संपर्क साधून करता येईल. तसेच www.sveri.ac.in या संकेतस्थळावरही नोंदणी करता येईल.या कार्यशाळेत पत्रकारांनी आणि पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन निमंत्रक प्रा. सी.बी.नाडगौडा,अध्यक्ष स्वेरी, कार्यशाळेचे समन्वयक दादासाहेब रोंगे व सोलापूर विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी केले आहे.

Related News