News Updates

सोलापूर विदयापीठाच्या पत्रकारिता विभागात भारत टीव्हीतर्फे कॅम्पस मुलाखती

सोलापूर - सोलापूर विदयापीठातील जनसंज्ञापन व पत्रकारिता विभागातील विदयार्थ्यांसाठी हैदराबाद येथील भारत टीव्ही या ऑनलाइन वेबपोर्टलसाठी कॅम्पस मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते.यात  प्राथमिक फेरीत 19 विदयार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

        हैदराबाद येथील रामोजी राव यांचा इनाडू  हा जगभरात प्रसिद्ध माध्यम समूह आहे आणि या समूहा तर्फे चालवले जाणारे  भारत टीव्ही हे वेब पोर्टल भारतातील विविध  भाषेत  सेवा उपलब्ध करुन देते. याच समूहाच्या मराठी ऑनलाइन वेबपोर्टल साठी सहिता लेखक, वार्ताहर तसेच इतर पदांसाठी सोलापूर विदयापीठातील जन संज्ञापन व पत्रकारिता विभागाच्या विदयार्थ्यांसाठी 13 एप्रिल 2018 रोजी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते.

   भ्रारत टीव्हीतर्फे झालेल्या लेखी परीक्षेत राहुल सोनवणे, संकेत कुलकर्णी, मानसी जाधव, प्रियंका लगशेट्टी, विजय थोरात, नितीन शिंदे, सीमा इंगवले, शितलकुमार कांबळे, शाहबाज शेख, अजय राजगुरू, वृंदा काळे, विठ्ठल आहेरवाडी, दिपाली जाखलेकर, गणेश पोळ, गौसपाक पटेल, अमोल सीताफळे, ऋतुराज स्वामी, भारत शिंदे, जाकीरहुसेन पीरजादेआदि विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील यशस्वी विदयार्थ्यांना भारत टीव्हीतर्फे नियुक्तीपत्र दिले जाणार आहे.

 ईनाडु हे एक ऑनलाइन न्यूज वेब पोर्टल आहे ज्यामध्ये बातम्या ऑनलाइन स्वरूपात प्रसिद्ध केल्या जातात यामध्ये भारतासोबतच जगभरात घडणाऱ्या घडामोडींचा समावेश असतो तसेच ईनाडु वरील बातम्या या एकूण 15 भाषांमध्ये प्रसिद्ध केल्या जातात. या परीक्षेसाठी पत्रकारिता विभागाच्या आजी व माजी अशा एकूण 32 उमेदवारांनी आपला सहभाग नोंदवला होता 

           मुंबई येथील ईटीव्ही भारतचे वृत्त समन्वयक राजेंद्र साठे,यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्यासमवेत भारत टीव्हीचे पत्रकार संतोष पवार होते.सदर मुलाखत यशस्वीरित्या पार पडावी म्हणून सोलापूर विदयापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. इ.एन. अशोककुमार, जनसंज्ञापन व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख .डॉ.रवींद्र चिंचोलकर ,प्रा.अंबादास भासके, प्रा. मधुकर जक्कन, तेजस्विनी कांबळे आदींनी परिश्रम घेतले. पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागात प्रथमच कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.  माध्यमांच्या क्षेत्राात विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळत आहेत याबाबत विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी समाधान व्यक्त केले.

 

 

Related News